

नगर: जिल्ह्यात १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या अंदाजामुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणार्या शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. पावसाअभावी टंचाईग्रस्त गावांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढू लागली आहेत. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळी सावट पसरले आहे.
अशा परिस्थितीत शनिवार ते सोमवार या तीन दिवशी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्यांसह नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा सुटणार असल्यामुळे जनतेने सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.