Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या दोन महिला जागांसाठी ‘दिग्गज’ मैदानात; ५६५ ठरावांनी वाढविली चुरस!

३,६४७ मतदारांची प्रारूप यादी जाहीर; विखे पाटील, राजळे, कोल्हे, थोरात, गडाख, पाचपुते यांच्यासह अनेक दिग्गजांच्या नावांची चर्चा
Ahilyanagar District Bank Election
Ahilyanagar District BankPudhari
Published on
Updated on

नगर: जिल्हा बॅंकेच्या 3647 मतदारांच्या प्रसिद्ध प्रारुप मतदार यादीवर हरकती सुरू आहेत. 21 जागांमधून आपल्या सोयीच्या मतदार संघातून अनेक इच्छुकांची चाचपणी आणि तशी व्यूहरचनाही सुरू झाली आहे. यात महिलांसाठीही दोन जागा असून, त्यासाठी 565 महिलांच्या नावाचे ठराव आलेले आहेत. यात, राजकारणात ताकद असलेली दिग्गज नावेही स्पर्धेत असल्याने या दोन जागांसाठीही मोठी चुरस वाढण्याची शक्यता आहे.

Ahilyanagar District Bank Election
Ahilyanagar Crime: लिफ्टच्या बहाण्याने वृद्ध महिलांना कारमध्ये बसवून लुटणारी टोळी जेरबंद!

जिल्हा बँकेची प्रारुप मतदार यादी जाहीर झाली. यात 3647 मतदार संस्था आहेत. महिलांच्या नावाने जिल्ह्यातील सोसायटी, बिगरशेती व शेतीपूरक मतदार संघातून 565 ठराव आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे महिलांच्या दोन जागांवर कोणाला संधी मिळू शकते, याविषयी आडाखे बांधले जात आहेत.

Ahilyanagar District Bank Election
Ahilyanagar Lakhpati Didi: बचतीतून भरारी! नगर जिल्ह्यात १.८० लाख महिला बनल्या ‘लखपती दीदी’

जिल्हा बँकेच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत स्व. अजित पवार आणि तत्कालिन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळाचा वरचष्मा दिसला होता. यात महिलांच्याही दोन जागा बिनविरोध काढून घेण्यात तत्कालिन नेत्यांना यश मिळाले होते. यामध्ये श्रीगोंद्यातून राष्ट्रवादीच्या अनुराधा राजेंद्र नागवडे आणि कर्जतमधून आशा काकासाहेब तापकीर यांना संधी दिली गेली होती. आता पाच वर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रारुप मतदार यादी जाहीर झाली असून, यात महिलांच्या नावानेही साधारणतः 565 ठराव आल्याचे समजते. मात्र गतवेळीपेक्षा यंदा राजकीय समिकरणेही बदलली आहेत. त्यामुळे साहजिकच महिलांच्या आरक्षित दोन जागांवरही मोठी स्पर्धा पहायला मिळणार आहे.

Ahilyanagar District Bank Election
Rahta Crime: साधूच्या वेशात आले, महिलेवर संमोहना’चा डाव; रोकड अन् सोन्याच्या अंगठ्या घेऊन पोबारा!

कोणा-कोणाची नावे स्पर्धेत

जि.प. माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनीका राजळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे यांच्या पत्नी चैताली आशुतोष काळे, आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मातोश्री उषाताई प्रसाद तनपुरे, नेवाशातून आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पत्नी रत्नमाला लंघे, माजी मंत्री शंकंरराव गडाख यांच्या पत्नी सुनीता गडाख (नेवासा), माजी महापौर सुवर्णा संदीप कोतकर, बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात, आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या मातोश्री प्रतिभा बबनराव पाचपुते, हर्षदा काकडे, माजी संचालिका अनुराधा राजेंद्र नागवडे, मनोरमा खेडकर, ॲड. सुभाष पाटील यांच्या पत्नी शशिकला पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे यांच्या स्नुषा उज्व्वला साबळे, शरद पवार गटाचे जिल्हा नेते राजेंद्र फाळके यांच्या कुटुंबातील विजयालक्ष्मी फाळके, माजी संचालक अंबादास पिसाळ यांच्या पत्नी सुनंदा पिसाळ (कर्जत), काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश साळुंके यांच्या पत्नी मीनाक्षी साळुंखे (जामखेड) आदींच्या नावाचे ठराव झालेले आहेत.

Ahilyanagar District Bank Election
Nagar Taluka Drought: पिकांपेक्षा शेतात चिंता उगवली; नगर तालुक्यात दुष्काळाचे सावट गडद

ऐनवेळी अन्य नावांवरही चर्चा शक्य

महिलांचे 565 ठराव हे सोसायटी मतदार संघ, बिगरशेती तसेच शेतीपूरक या तीनही मतदार संघातून झाल्याचे दिसले आहे. विशेष म्हणजे, महिलांच्या दोन जागांवर उमेदवारी करण्यासाठी आपल्या नावाचे ठराव नसले तरी चालतात, मात्र जिल्हा बँकेची सभासद असलेल्या ‘त्या’ संस्थेचे आपण केवळ सभासद असणे गरजेचे आहे, असेही सांगितले जाते. त्यामुळे वरील दिग्गज नावांशिवायही ऐनवेळी राजकीय समझोत्यातून अन्य कोणाची नावे पुढे येऊ शकतात का, याविषयीही अंदाज बांधले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news