Ahilyanagar Crime: लिफ्टच्या बहाण्याने वृद्ध महिलांना कारमध्ये बसवून लुटणारी टोळी जेरबंद!

जीवे मारण्याची धमकी देत हिसकावले दागिने; चालत्या कारमधून महिलेला ढकलल्याचा धक्कादायक प्रकार, महिला आरोपीसह दोघांना अटक
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

नगर: रस्त्यावर थांबलेल्या वृद्ध महिलांना कारमध्ये लिफ्ट देण्याचा बहाणा करून, त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन दागिने लुटणाऱ्या एका सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी पर्दाफाश केला. या कारवाईत एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मिरजगाव व पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 'चैन स्नॅचिंग'चे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. कोमल भाऊसाहेब नन्नवरे (वय ३०, रा. डावरवाडी, ता. पैठण), लक्ष्मण मोहन जामदार (वय २६, रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Crime
Ahilyanagar Lakhpati Didi: बचतीतून भरारी! नगर जिल्ह्यात १.८० लाख महिला बनल्या ‘लखपती दीदी’

२० ऑगस्ट २०२६ रोजी कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथील द्वारकाबाई उत्तम डाडर (वय ६५) या मिरजगाव येथे जाण्यासाठी रस्त्यावर थांबल्या होत्या. त्या वेळी कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांना मिरजगावला सोडतो, असे सांगून कारमध्ये बसवले. काही अंतरावर नेल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि चालत्या कारमधून ढकलून दिले. याप्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime
Rahta Crime: साधूच्या वेशात आले, महिलेवर संमोहना’चा डाव; रोकड अन् सोन्याच्या अंगठ्या घेऊन पोबारा!

या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीनुसार तारकपूर बसस्टँड परिसरातून संशयित महिला आरोपी कोमल नन्नवरे हिला ताब्यात घेतले. त्यानंतर सोलापूर रोडने कारने अहिल्यानगर शहराकडे येणाऱ्या लक्ष्मण जामदार याला कोंबडीवाला मळा परिसरातून सापळा रचून जेरबंद केले.

Crime
Nagar Taluka Drought: पिकांपेक्षा शेतात चिंता उगवली; नगर तालुक्यात दुष्काळाचे सावट गडद

चौकशीत आरोपींनी नागलवाडी येथील घटनेसह पाथर्डी ते अहिल्यानगर रस्त्यावर एका वृद्ध महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून कार, सोन्याचे दागिने व मोबाईल असा आठ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, आरोपींनी नागलवाडी येथून चोरलेले दागिने विकून आलेली रक्कम बँक खात्यात जमा केल्याची माहिती दिली आहे. आरोपींना तपासाकामी मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news