Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दसऱ्याला ‘सत्तेचे सोने’ लुटण्याची धावपळ!

२१ पैकी दोन जागा बिनविरोध; आणखी तीन जागांवर तडजोडीचे प्रयत्न, २०० हून अधिक उमेदवारांचे अर्ज शिल्लक
Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District BankPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: विजयादशमीला सीमोल्लंघन करून सोनं लुटण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा जिल्हा बँकेच्या राजकीय आखाड्यात विजयादशमीच्या मुहूर्तावर केवळ आपट्याची पानं नव्हे, तर संचालकपदाची स्वप्नं पाहणाऱ्या राजकीय महत्त्वाकांक्षांचंही सोनं लुटलं जाण्याची तयारी आहे. दि. 20 ऑक्टोबरला दसरा आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी, 21 ऑक्टोबरला अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. त्यामुळे आपापल्या मतदारसंघातील जागा बिनविरोध करण्यासाठी राजकीय यंत्रणांनी समोरील उमेदवाराच्या मनधरणीला ‘तन-मन-‘धना’ने वेग दिला आहे.

Ahilyanagar District Bank
Ahilyanagar Dam Water Storage: अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांवर पाणीटंचाईचे सावट; साडेचार टीएमसी पाणीसाठा बफर म्हणून राखीव

आता किती इच्छुकांचे उमेदवारीचे सीमोल्लंघन रोखण्यात यश येतंय अन् कोण कोण बिनविरोध जिल्हा बँकेत जातंय, याची उत्कंठा लागली आहे. जिल्हा बँकेच्या 21 पैकी दोन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. आणखी तीन जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र, उर्वरित 16 जागांवरील लढतींचे चित्र स्पष्ट करण्यासाठी पक्षश्रेष्ठींसह स्थानिक नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. अद्याप 200 हून अधिक उमेदवारांचे अर्ज असल्याने माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

Ahilyanagar District Bank
Ahilyanagar Girl Child Birth Rate: अहिल्यानगर जिल्ह्यात मुलींच्या जन्माला उतरती कळा; साडेचार वर्षांत मुलांपेक्षा १२ हजार ४१९ मुली कमी

दसऱ्याच्या सोन्याला निवडणुकीने झळाली!

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्यांचे अर्ज शिल्लक आहेत, त्यांना मोठा ‘भाव’ आला आहे. त्याचबरोबर ज्या मतदार संघात निवडणूक होईल, तेथील मतदारांचीही ‘किंमत’ वाढणार आहे. मात्र, निवडणूक परवडणारी नसल्याचे इच्छूक उमेदवारांना माहिती आहे. त्यामुळेच ज्यांचे अर्ज आहेत, त्यांना माघारीसाठी विनंती सुरू झाली आहे. कोणाच्या अर्जावर, कोणाचा प्रभाव चालणार, कोण कोणाचं ऐकणार, त्याबदल्यात ‘काय’ दिलं जाणार, याचे अंदाज काढले जात आहे. लाखमोलाचा ‘शब्द’ही देण्याची तयारी सुरू आहे. श्रीगोंद्यासह काही तालुक्यातील कार्यकर्ते इच्छूक उमेदवारांसह, मतदारांच्या याद्या घेऊन ग्राऊंडवर उतरले आहेत.

Ahilyanagar District Bank
MPSC Students Protest: एमपीएससी आंदोलनातून विद्यार्थ्यांना काय मिळाले? रोहित पवारांनी उत्तर द्यावे: विक्रम पाचपुते

जिल्हा परिषद, पंचायत समितीचे गाजर!

उमेदवारांना माघारीसाठी तयार करताना केवळ ‘विनंती’ पुरेशी ठरणार नाही. कुणाला आगामी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीत संधीचे, रसद पुरविण्याचे आश्वासन, भरतीत मुलांसाठी प्राधान्याचे आमिष, गावच्या सत्तेसाठी मदत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अर्थात, या संभाव्य राजकीय तडजोडींना प्रत्यक्षात कितपत आकार येतो, हे अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होईल.

Ahilyanagar District Bank
Ahilyanagar Health Centers: अहिल्यानगर जिल्ह्यात १७ नवीन आरोग्य केंद्रे, १३४ उपकेंद्रांचा प्रस्ताव

सत्तेचे फटाके की प्रचाराचा धुराळा

सर्व जागांवर बिनविरोध निवडणूक करण्यासाठी थोरात-विखे गटाचे प्रयत्न आहेत. मात्र, विरोधकही आक्रमक असल्याने, दसर्यापूर्वी जिल्हा बँकेत नव्या सत्ताधाऱ्यांच्या स्वागताचे राजकीय फटाके फुटतील की दिवाळीला निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडेल, याचे उत्तर अर्ज माघारीनंतर मिळणार आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सध्या प्रत्येक अर्ज महत्त्वाचा, प्रत्येक शब्द मोलाचा आणि प्रत्येक माघार राजकीय समीकरण बदलवणारी ठरू शकते. त्यामुळे यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर 21 तारखेपूर्वी बिनविरोध बँकेत पोहचत, सत्तेचं सोनं कोण लुटणार आणि त्यासाठी ‘किंमत’ काय असेल, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news