Ahilyanagar Girl Child Birth Rate: अहिल्यानगर जिल्ह्यात मुलींच्या जन्माला उतरती कळा; साडेचार वर्षांत मुलांपेक्षा १२ हजार ४१९ मुली कमी

नवरात्रोत्सवात आदिशक्तीचा जागर, पण मुलींच्या जन्मदरात घट; गर्भलिंगनिदान रोखण्याचे आव्हान कायम
Child
ChildPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: दुर्गामातेला घरी येण्याचे आवाहन करणारे आणि स्त्रीगर्भाचे प्रतीक असलेले घट घरोघर बसवून रविवारी आई देवीचा उदो उदो सुरू झाला खरा; पण स्त्री शक्तीचा घट अहिल्यानगर जिल्ह्यात तरी काहीसा रिकामाच असल्याचे पुढे आले आहे... घटस्थापना करताना जयजयकार केलेल्या आदिमायेचेच रूप मानल्या जाणाऱ्या मुलींचा जन्मदर मुलांच्या तुलनेत गेल्या साडेचार वर्षांत तब्बल साडेबारा हजारांनी (सुमारे पाच टक्क्यांनी) घटल्याचे स्पष्ट झाले आहे.

Child
MPSC Students Protest: एमपीएससी आंदोलनातून विद्यार्थ्यांना काय मिळाले? रोहित पवारांनी उत्तर द्यावे: विक्रम पाचपुते

जिल्हाधिकाऱ्यांनी नुकत्याच घेतलेल्या आढाव्यात ही आकडेवारी समोर आल्यानंतर गर्भलिंगनिदान आणि गर्भपात या विषयावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ते रोखण्यासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीलच; पण या नवरात्रोत्सवात तरी स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा निर्धार प्रत्येकाने केला, तरी ती आदिशक्तीची खऱ्या अर्थाने आराधना ठरेल.

Child
Ahilyanagar Health Centers: अहिल्यानगर जिल्ह्यात १७ नवीन आरोग्य केंद्रे, १३४ उपकेंद्रांचा प्रस्ताव

२०२२-२३ ते एप्रिल २०२६ पर्यंतच्या साडेचार वर्षांत जिल्ह्यात १ लाख ४५ हजार १३२ मुलांचा आणि १ लाख ३२ हजार ७१३ मुलींचा जन्म झाला. म्हणजे, या कालावधीत मुलींच्या तलनेत १२ हजार ४१९ मुले जास्त जन्मले. मुलांच्या तुलनेत कमी मुलींचा जन्म झाला. हीच तफावत मागील दहा वर्षांपासून कायम असल्याचेही या निमित्ताने पुढे आले.

Child
Sujay Vikhe Patil: विखे-पाटलांच्या मध्यस्थीने लहामटे-पिचड समझोत्याची शक्यता?

एकूण जन्मसंख्येतही सातत्याने घट

2022-23 मध्ये मुलगा आणि मुलगी असे 72 हजार 645 असलेली एकूण जन्मसंख्या 2024-25 मध्ये 63 हजार 55 वर आली. म्हणजे तीन वर्षांत एकूण जन्मसंख्येत देखील सुमारे 13.02 टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले. मुलींच्या जन्माची संख्या 34 हजार 687 वरून, 30 हजार 154, तर मुलांची संख्या 37 हजार 958 वरून 32 हजार 901 झाली.

Child
Haregaon Post Office: हरेगाव पोस्ट ऑफिसची इमारत जीर्ण; स्थलांतरासाठी ग्रामस्थांचा आग्रह

प्रशासनाकडून जनजागृती

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे आदी आपल्या टीमच्या माध्यमातून मुलींचा जन्मदर वाढीसाठी जनजागृती करत आहेत. त्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ, लेक लाडकी, अशा अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. त्यात सध्या अपेक्षित यश नसले तरी, आशावाद कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news