

नगर: जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नव्याने 17 आरोग्य केंद्रासह 134 नवीन उपकेंद्राच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेतून हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, शासनाने हिरवा कंदिल दिल्यास अहिल्यानगरच्या आरोग्य सेवेला आणखी बळकटी मिळणार आहे.
अहिल्यानगर जिल्हा हा क्षेत्रफळासोबत लोकसंख्येतही विशाल आहे. जिल्ह्यात 115 आरोग्य केंद्र आणि 598 उपकेंद्रांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवली जात आहे. मात्र, लोकसंख्या विचारात घेता आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र संख्या वाढवण्यासाठी 2017-18 पासून जिल्हा परिषदेचा पाठपुरावा सुरू होता. यामध्ये 2011 आणि आता 2024 ची लोकसंख्या गृहीत धरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सखोल अभ्यास करत, नवीन 17 आरोग्य केंद्र आणि 134 उपकेंद्रांचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचा सर्वसाधारण सभेचा ठरावही घेतला आहे. जिल्हा नियोजनच्या बैठकीनंतर हा प्रस्ताव शासनाकडे जाणार आहे. त्याठिकाणी यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. त्यासाठी राजकीय पाठबळाची गरज भासणार आहे. आरोग्य केंद्रांच्या संख्येत वाढही होऊ शकते.
प्रस्तावित 134 उपकेंद्र कुठे कुठे होणार?
राहुरी : वांजूळपोई, संक्रापूर, बारागाव नांदूर, तुळापूर.शेवगाव : नागलवाडी, आंतरवली बु,. पाथर्डीः माळेवाडी,सोनोशी, अकोले, मांडवे, मढी, निपाणी जळगाव, वडगाव, घाटशिरस, हनुमान टाकळी, तांदूळवाडी, तिसगाव, फुंदेटाकळी, दैत्यनांदूर. अकोलेः पिंपळगाव निपाणी, डोंगरगाव, कुंभफळ, औरंगापूर, नागरवाडी, मान्हेरे, रथवाडी, मुथाळणे, कुमशेत, कोतूळ, फोफसंडी, पैठण, ब्राम्हणवाडा, आंबेवगण, माणिकओझर, वाघदरी, चिचोंडी, केळंगुण, वारी, शेरखेल टिटवी, कोहंडी. नेवासाः खुपटी, नेवासा बुद्रुक, घोगरगाव, कुकाणा, शिरसगाव, जळके बु, प्रवरा संगम, गोंडेगाव, शास्त्रीनगर चांदा, कृष्णानगर, नांदूर शिकारी, शहापूर, लांडेवाडी (भेंडा), यशवंतनगर, वंजारवाडी, श्रीरामवाडी. नगरः इमामपूर, विळद, वडारवाडी, रांजणी, बुरुडगाव, आगडगाव. कर्जतः गणेशवाडी, सोनाळवाडी, चांदे, बारडगाव दगडी, चिंचोली काळदात, राक्षसवाडी. श्रीरामपूरः दत्तनगर, सरला, भामाठाण. संगमनेरः मालुंजे, कोल्हेवाडी, धांदरफळ, जवळेकडलग, अकलापूर, साकूर, जांभुळवाडी, खांजापूर, पोखरी हवेली, पिंपळगाव कोझीरा. कोपरगावः माहेगाव देशमुख, टाकळी, सोनेवाडी, खिर्डी गणेश, कारवाडी, मोतीनगर, नऊचारी, माळवाडी, जेऊर पाटोदा, तिळवणी.
राहाताः लोणी बु., नांदूर बु., पिंपळवाडी, निघोज, तिसगाव, गोदावरी वसाहत, केलवड बु., प्रवरानगर, लोणी खु, हसनापूर, ममदापूर, कोऱ्हाळे, नपावाडी, मुसळेवस्ती. श्रीगोंदाः बोरी, कोळगाव, कौठा, काष्टी, उकलगाव, तांदळी दुमाला, बेलवंडी स्टेशन, राहिंजवाडी, सांगवीदुमाला, पांढरेवाडी, वडाळी, बांगर्डे, वडघूल, बाबुर्डी, अरणगाव दुमाला, गव्हाणेवाडी, हिंगणी दुमाला,खरातवाडी, ऐरंडोली. पारनेर : रुईछत्रपती, पळवे खु, गणोरे, बाभुळवेडे, अस्तगाव, सुतारवाडी, चोंभूत, पठारवाडी, सिद्धेश्वरवाडी.
नवीन 17 आरोग्य केंद्र कोणती होणार?
2011 आणि 2024 च्या लोकसंख्या गृहीत धरून आरोग्य केंद्र व उपकेंद्र वाढवले जात आहेत. यात लिंपणगाव, अजनूज, भानगाव (श्रीगोंदा), राजुरी, केलवड, लोणी खुर्द (राहाता), मोरेचिंचोरे (नेवासा), कोरेगाव (कर्जत), निंबळक, बुऱ्हाणनगर (नगर), कोरडगाव, करंजी, चिचोंडी, मोहटे, (पाथर्डी), लाडजळगाव, आखेगाव (शेवगाव), सुकेवाडी (संगनमेर).