Ahilyanagar District Bank Election: लोणीतून जिल्हा बँकेचे नवे राजकीय समीकरण? विखेंच्या निवासस्थानी महायुतीच्या दिग्गजांची मांदियाळी

सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठक; जिल्हा बँकेसाठी ‘समझोता एक्सप्रेस’ची चर्चा, शिंदे-थोरातही एकत्र येण्याचे संकेत
Ahilyanagar District Bank Election
Ahilyanagar District BankPudhari
Published on
Updated on

नगर: जिल्हा बँकेसाठी समविचारी नेत्यांच्या आघाड्या-युतीच्या चाचपण्या सुरू झाल्या आहेत. त्यातच, गुरुवारी (दि. २७) राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार लोणी येथे आल्या असता, विखे पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या सत्कार सोहळ्याला महायुतीच्या दिग्गजांची उपस्थिती आवर्जून दिसली. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आवर्जून सर्वांचा एक-एक करत सत्कार केल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे एरव्ही ‘विखे यांच्याविरोधात जिल्हा’ असे समीकरण रंगवले जात असताना या वेळी मात्र ‘जिल्हा विखेंसोबतच’ असल्याचे चित्र पुन्हा एकदा तयार होताना दिसत आहे. कदाचित, लोणीतूनच जिल्हा बँकेचे नवे समीकरण उभे राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Ahilyanagar District Bank Election
Fodder Shortage: पावसाअभावी नगर तालुक्यात चारा टंचाईचे संकट; पशुधन जगविणे कठीण

जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाची जबाबदारी आहे. सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामळे सुनेत्रा पवार यांचा गुरुवारचा लोणी दौरा आणि विखे पाटील यांच्या निवासस्थानी झालेली मॅरेथॉन बैठक महत्त्वाची ठरल्याचे मानले जात आहे.

Ahilyanagar District Bank Election
Sangamner Rain Deficit Kharif Crops: पावसाने पाठ फिरवताच संगमनेर-श्रीरामपूरमध्ये खरीप संकटात; सुकणारी पिके वाचवण्यासाठी आवर्तनाची मागणी

बँकेच्या अनेक इच्छुकांची हजेरी

या वेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर व चंद्रशेखर घुले, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, तसेच आमदार काशीनाथ दाते, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, अनुराधा नागवडे; भाजपच्या आमदार मोनिका राजळे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार अक्षय कर्डिले; शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, माजी आमदार चंद्रशेखर कदम, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आदींची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने डॉ. सुजय विखे पाटील यांनी सर्व आमदारांचा आवर्जून सत्कार केला. उपस्थितांमध्ये जिल्हा बँकेसाठी तब्बल 10 पेक्षा अधिक इच्छुक व संभाव्य उमेदवार होते.

Ahilyanagar District Bank Election
Ahilyanagar National Sports Day: राष्ट्रीय क्रीडा दिनी अहिल्यानगर क्रीडामय; प्रोफेसर कॉलनी चौकात खेळाडूंच्या कौशल्याचा थरार

..तर विखेंसोबत शिंदे-थोरातही येणार एकत्र?

आमदार राम शिंदे यांनी बँकेसाठी जुळवाजुळव सुरू केल्याचे लपून राहिलेले नाही. त्यांनी विखे सोडून अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. थोरातांच्याही ते संपर्कात आहेत. मात्र, ज्या वेळी ‘जिल्हा’ एका विचाराने एकत्र येईल, त्या वेळी शिंदे-थोरातही याच गटासोबत असतील आणि हा गट विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात तयार होईल, असा काहीसा अंदाज लोणी येथील गुरुवारच्या राजकीय हालचालींतून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यापुढील राजकीय घडामोडींनाही विशेष महत्त्व असेल, हे नक्की.

पारनेर सोडून बिनविरोधची चर्चा

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करावी, यासाठी महायुतीचे सर्वच नेते अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पारनेर तालुक्यातील सोसायटी मतदारसंघाची जागा (खासदार नीलेश लंके) बिनविरोध देऊ नये, असाही अनेकांचा सूर असल्याचे खासगीत एका नेत्याने ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

Ahilyanagar District Bank Election
Jamkhed Police Action: कर्णकर्कश बुलेटस्वारांवर जामखेड पोलिसांचा दणका; १२ बुलेट ताब्यात, १२ हजारांचा दंड

डॉ. सुजय विखे यांचे बेरजेचे राजकारण

गेल्या काही दिवसांपासून डॉ. सुजय विखे पाटील हे अनुभवी आणि तितकेच मुरब्बी राजकारणी बनल्याचे मानले जाते. त्यांच्या भाषणांतूनही ते जाणवते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची तयारी दिसत असल्याचे जाणकार मानतात. कदाचित, त्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबाबतीत त्यांची काहीशी सौम्य झालेली भूमिका असेल, प्रसंगी आमदार विवेक कोल्हे यांच्या सत्काराचीही त्यांनी तयारी दर्शवत दाखवलेला राजकीय मोठेपणा, हा उद्याच्या ‘समझोता एक्सप्रेस’चाच एक भाग समजला जात आहे. त्यात लोणीत बँकेसाठी दिग्गज असलेल्या नेत्यांसमवेत त्यांची झालेली सकारात्मक चर्चा हीदेखील बँकेच्या निवडणुकीसाठी त्यांना फायदेशीर ठरणार असल्याचेच बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news