Ahilyanagar National Sports Day: राष्ट्रीय क्रीडा दिनी अहिल्यानगर क्रीडामय; प्रोफेसर कॉलनी चौकात खेळाडूंच्या कौशल्याचा थरार

मल्लखांब, हॉकी, बॉक्सिंग ते रायफल शूटिंगपर्यंत विविध खेळांची रंगतदार प्रात्यक्षिके; तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे, असा संदेश
Ahilyanagar National Sports Day
Ahilyanagar National Sports DayPudhari
Published on
Updated on

नगर: खेळांविषयी जनजागृती निर्माण होऊन क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी, तसेच तरुण पिढीने मैदानी खेळांकडे वळावे, या उद्देशाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शनिवारी (दि.२९) अहिल्‍यानगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात विविध खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी संपूर्ण चौक खेळाडूंनी गजबजून गेला होता. विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. या उपक्रमामुळे परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.

Ahilyanagar National Sports Day
Jamkhed Police Action: कर्णकर्कश बुलेटस्वारांवर जामखेड पोलिसांचा दणका; १२ बुलेट ताब्यात, १२ हजारांचा दंड

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर, जिल्हा ऑलिंपिक संघटना, एकविध खेळ संघटना आणि विविध क्रीडा मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक महेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, नगरसेवक करण कराळे, पुष्कर कुलकर्णी, सतीश शिंदे, मनोज दुल्लम, तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सुनील जाधव, कोमल वाकळे, मनीषा पुंडे आदी उपस्थित होते.

Ahilyanagar National Sports Day
Ashok Cooperative Bank RBI Restrictions: अशोक सहकारी बँकेवर आरबीआयचे सहा महिन्यांचे निर्बंध; ठेवीदारांमध्ये खळबळ

प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाची पार्श्‍वभूमी विशद केली. चंद्रकांत काळोखे यांनी हॉकी खेळासाठी मेजर ध्यानचंद यांनी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. नगर शहरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत आणि त्यांनी देशासाठी पदके मिळवावीत, अशी अपेक्षा नगरसेवक करण कराळे यांनी व्यक्त केली. आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, शहरात खेळाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Ahilyanagar National Sports Day
Ahilyanagar Stray Dog Shelter: मोकाट श्‍वानांसाठी महापालिकेचा ‘शेल्टर’चा आधार; १०० श्‍वानांच्या निवाऱ्यासाठी अनुदान

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जलतरण संघटनेचे रावसाहेब बाबर, ऑलिंपिक संघटनेचे शैलेश गवळी, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, प्रवीण कोंढावळे, श्री समर्थ प्रशाळेच्या प्राचार्य वसुधा जोशी, क्रीडा शिक्षक लोंढे, आसिफ शेख, नंदेश शिंदे, प्रा. संजय साठे, सुदर्शन कोतकर, सुनील गोडळकर, आदित्य धोपावकर, निलेश मदने, गणेश वारुळे, रामेश्‍वर चेमटे, विकास परदेशी आणि संजय धोपावकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब बाबर यांनी केले.

Ahilyanagar National Sports Day
Shrirampur School Children Car Accident: भरधाव कारची शाळकरी चिमुकल्यांना धडक; सहा विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

मल्लखांबपटूंना उत्स्फूर्त दाद

या कार्यक्रमात झुंबा नृत्‍य झाले. हॉकीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. पुरलेला मल्लखांब आणि रोप मल्लखांबच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकविला. मल्लखांबपटूंनी सादर केलेल्या विविध कसरतींना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. याशिवाय सायकलिंग, स्केटिंग, रायफल शूटिंग, तलवारबाजी, व्हॉलीबॉल, ज्युदो, कुस्ती, बॉक्सिंग आणि खो-खो या विविध क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आल्‍याने परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news