Jamkhed Police Action: कर्णकर्कश बुलेटस्वारांवर जामखेड पोलिसांचा दणका; १२ बुलेट ताब्यात, १२ हजारांचा दंड

खर्डा चौकात विशेष मोहीम; मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांची कारवाई, पुन्हा नियमभंग केल्यास सायलेन्सर जप्त करण्याचा इशारा
Bullet Silencer Seizure
Bullet Silencer SeizurePudhari
Published on
Updated on

जामखेड: जामखेड शहरातील विविध भागांत कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटमुळे नागरिक हैराण झाले होते. याबाबत नागरिकांकडून पोलिसांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जामखेड पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येत बुलेटस्वारांवर कारवाई केली. शहरातील खर्डा चौक परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत १२ बुलेट जमा करून संबंधित वाहनधारकांकडून प्रत्येकी एक हजार असा एकूण १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Bullet Silencer Seizure
Ashok Cooperative Bank RBI Restrictions: अशोक सहकारी बँकेवर आरबीआयचे सहा महिन्यांचे निर्बंध; ठेवीदारांमध्ये खळबळ

बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः बाजारपेठ, चौक तसेच रहिवासी भागातून मोठ्या आवाजात बुलेट धावत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. याबाबत नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी अशा वाहनांवर लक्ष केंद्रित केले.

Bullet Silencer Seizure
Ahilyanagar Stray Dog Shelter: मोकाट श्‍वानांसाठी महापालिकेचा ‘शेल्टर’चा आधार; १०० श्‍वानांच्या निवाऱ्यासाठी अनुदान

त्यानुसार शहरातील खर्डा चौकात पोलिसांनी विशेष कारवाई करत कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान १२ बुलेट जमा करण्यात आल्या. संबंधित वाहनधारकांकडून प्रत्येकी एक हजारांचा दंड आकारण्यात आला असून, एकूण १२ बुलेट 12 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Bullet Silencer Seizure
Shrirampur School Children Car Accident: भरधाव कारची शाळकरी चिमुकल्यांना धडक; सहा विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

पोलिसांच्या या कारवाईमुळे कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना चांगलाच दणका बसला असून, शहरातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. नागरिकांना त्रास होईल, अशा पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Bullet Silencer Seizure
Ahilyanagar Tourists Nepal Floods: नेपाळमधील जलप्रलयात अडकले ४५ पर्यटक; नगर जिल्ह्यातील २७ जण सुखरूप!

बुलेटला मॉडिफाइड सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. यापुढे पुन्हा असा आवाज करणारी गाडी आढळल्यास सायलेन्सर काढून घेण्यात येईल.

दशरथ चौधरी, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news