Ahilyanagar Country Made Pistol Seizure: शेंडी बायपासवर गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद, पाच पिस्तुले जप्त

एलसीबीची शिताफीची कारवाई; १०.९० लाखांचा मुद्देमाल जप्त, धाराशिवमधील मुख्य शस्त्रपुरवठादार फरार
Ahilyanagar Country Made Pistol Seizure
Ahilyanagar Country Made Pistol SeizurePudhari
Published on
Updated on

नगर: शेंडी बायपास रस्त्यावर आलिशान कारमधून गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचून अटक केली. त्यांच्या ताब्यातून पाच गावठी पिस्तुले, आलिशान कार व मोबाईल असा एकूण १० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अटक केलेल्या आरोपीवर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Ahilyanagar Country Made Pistol Seizure
Shrirampur Crime: "कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही; श्रीरामपूरातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करा": अपर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता यांचे आदेश

पिंटू उर्फ भाऊ आनंदा रसाळ (वय ४०, रा. रसाळवाडी, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), बंटी उर्फ स्वप्निल बिभीषण पाबळे (वय ३०, रा. कावळ पिंपरी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी उपनिरीक्षक अनंत सालगुडे, कृष्णकुमार सेदवड यांच्या पथकाने एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तपास सुरू केला.

Ahilyanagar Country Made Pistol Seizure
Pathardi Police Colony: पाथर्डीतील २३.८१ कोटींची पोलिस वसाहत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; कर्मचारी अजूनही भाड्याच्या घरात

१९ जुलै रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, भाऊ आनंदा रसाळ आणि बंटी उर्फ स्वप्निल पाबळे हे दोघे गावठी पिस्तुल घेऊन विक्रीसाठी एमआयडीसी डेअरी चौक ते शेंडी बायपास रस्त्यावर ग्राहक शोधत थांबले आहेत.

Ahilyanagar Country Made Pistol Seizure
Ahilyanagar Milk Adulteration: अहिल्यानगरमध्ये दूध भेसळीवरील कारवाई थंडावली? अन्न प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

त्यानुसार पथकाने छापा घालून कार पकडली आणि वरील दोघांना ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता पाच गावठी पिस्तुल, अलिशान कार, दोन मोबाईल असा १० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Ahilyanagar Country Made Pistol Seizure
Shrirampur Crime News: श्रीरामपूरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढा; बाळासाहेब थोरातांची सरकारकडे कठोर कारवाईची मागणी

धाराशिवमधून आणले गावठी पिस्तुल

पकडण्यात आलेल्या शस्त्रांबाबत विचारपूस केली असता, आरोपी भाऊ रसाळ याने सांगितले की, हे गावठी पिस्तुल भैय्या उर्फ ऋषिकेश सुभाष भोसले (रा. जि. धाराशिव) याच्याकडून विकण्यासाठी आणले होते. मुख्य पुरवठादार भैय्या भोसले हा सध्या फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news