

नगर: गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून महिलांचा आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मानाचा गौरव करण्यासाठी दैनिक ‘पुढारी’ आणि पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने महिलांच्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक 15 मार्च 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता ‘शिंगवी ज्वेलर्स’ सर्जेपुरा येथून या रॅलीचा शुभारंभ होणार आहे.
स्त्रीशक्तीचा हुंकार आणि परंपरेचा सन्मान करणारी ही रॅली अहिल्यानगरच्या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. या वर्षीच्या रॅलीचे मुख्य प्रायोजक क्रस्ना डायग्नोस्टिक असून, व्हेन्यू पार्टनर शिंगवी ज्वेलर्स आहे.
क्रस्ना डायग्नोस्टिकच्या वतीने 15 मार्च रोजी महिलांची मोफत रँडम रक्त तपासणी करण्यात येणार आहे. तसेच विविध तपासण्यासाठी 20 टक्के सवलत असलेलं डिस्काउंट व्हाउचर सर्व महिलांना मोफत देण्यात येणार आहे,अशी माहिती क्रस्ना डायग्नोस्टिक च्या कार्यसंचालिका पल्लवी जैन यांनी दिली.
नोंदणी आणि नियम
ऑनलाईन नोंदणी अनिवार्य: लकी ड्रॉ आणि खात्रीशीर भेटवस्तूंसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अहिल्यानगरच्या महिलांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होऊन नववर्षाचे स्वागत उत्साहात करावे, असे आवाहन दैनिक ‘पुढारी’ आणि कस्तुरी क्लबतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी
संपर्क: 8888866426 9881244987
असा असेल रॅलीचा मार्ग
सर्जेपुरा-अप्पू हत्ती चौक - पत्रकार चौक - प्रेमदान चौक - प्रोफेसर कॉलनी - भिस्तबाग - पाईपलाईन रोड - श्रीराम चौक - पाईपलाईन रोड - डी मार्ट - सावेडी नाका - प्रेमदान चौक - पत्रकार चौक - सर्जेपुरा
नोंदणी लिंक:
सहभागी होण्यासाठी
https://forms.gle/K8wK5kT BX6ynexUM6 या लिंकवर जाऊन आपला गुगल फॉर्म भरावा. ड्रेस कोड- रॅलीत सहभागी होणाऱ्या महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा किंवा सफेद कुर्ता आणि जीन्स.
प्रत्येक महिलेला मानाचा फेटा:
सकाळी 7.30 पूर्वी उपस्थित राहणाऱ्या सर्व सहभागी महिलांना दैनिक ‘पुढारी’तर्फे मानाचा फेटा. सर्व सहभागी महिलांना चहा व अल्पोपाहाराची सोय करण्यात आली आहे. उपस्थित महिलेला हमखास गिफ्ट कुपन. रॅलीमध्ये सर्व महिलांना मोफत प्रवेश.