Census 2027 Digital India: जनगणना-2027ची डिजिटल तयारी वेगात; 1 मेपासून स्वगणना सुविधा

मे-जूनमध्ये घरयादी व घरगणना; 9 हजार प्रगणकांची नियुक्ती
Census 2027 Digital India
Census 2027 Digital IndiaPudhari
Published on
Updated on

नगर: जिल्ह्यात जनगणना-2027 या राष्ट्रीय कार्यक्रमाची पूर्वतयारी जोरात सुरू झाली असून, घरयादी व घरगणना मे-जून महिन्यांत होणार आहे. ही प्रक्रिया डिजिटल माध्यमाद्वारे होणार असल्याने नागरिकांना स्वगणना करण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. त्यासाठी वेबपोर्टल उपलब्ध केले जाणार असून, नागरिकांना 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत माहिती भरावी लागणार आहे.

Census 2027 Digital India
Ahilyanagar Urban Bank Scam: नगर अर्बन बँक घोटाळा; 291 कोटी प्रकरणात 72 मालमत्ता जप्त

देशात कल्याणकारी ध्येयधोरणे राबविण्यासाठी लोकसंख्येची सखोल माहिती आवश्यक असल्याने जनगणना महत्त्वपूर्ण ठरत आहे. देशाची पहिली दशवार्षिक जनगणना 1872 पासून सुरू झाली. येणारी 2027 ही जनगणना पहिलीच डिजिटल जनगणना असणार आहे.

Census 2027 Digital India
Ahilyanagar Gas Pipeline Controversy: 24 तासांत गॅस पाईपलाईन परवानगीवरून वाद; नगरसेवकांचा तीव्र विरोध

‌‘जनगणना-2027‌’ दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना तर दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये प्रत्यक्षात लोकसंख्या गणना केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील घरयादी व घरगणना ही प्रक्रिया 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबवली जाणार आहे. प्रत्यक्ष क्षेत्रकार्यास प्रारंभ होण्यापूर्वी 15 दिवस अगोदर म्हणजे 1 मे ते 15 ते या कालावधीत स्वगणना करण्यासाठी https://test.census.gov.in/se/ वेब पार्टल उपलब्ध केले जाणार आहे.

Census 2027 Digital India
Ahilyanagar Tax Collection Decline: अहिल्यानगर महापालिकेच्या कर वसुलीत 8 कोटींची घसरण; आर्थिक संकट गडद

या पोर्टलवर इंग्रजी, हिंदी व इतर 14 भाषांची सुविधा असणार आहे. या उपक्रमामुळे कुटुंबांना त्यांच्या सोयीनुसार तपशील भरण्यासाठी एक सुरक्षित आणि लवचिक माध्यम उपलब्ध होणार आहे. घरयादी व घरगणना करण्यासाठी अधिकारी - कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Census 2027 Digital India
Ashok Kharat: चार्जशीटमधून अशोक खरातचे नाव वगळल्याने खळबळ; फेरतपासाची शक्यता

नऊ हजार प्रगणकांची नियुक्ती

जनगणनेच्या क्षेत्रिय कामकाजासाठी जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्र वगळता 30 चार्ज अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये 14 तहसीलदार 15 नगरपालिका मुख्याधिकारी व एक छावणी सीईओ यांचा समावेश आहे. क्षेत्रीय स्तरावर घरयादी व घरगणना करताना प्रगणकांमार्फत 33 प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. या कामासाठी 9 हजार प्रगणक - पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. प्रगणकांना स्वत:चा मोबाईल वापरून घरांची माहिती डिजिटल पद्धतीने संकलित करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news