Ashok Kharat: चार्जशीटमधून अशोक खरातचे नाव वगळल्याने खळबळ; फेरतपासाची शक्यता

आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणात प्रश्नचिन्ह; पोलिसांकडून नव्याने चौकशी सुरू
Ashok Kharat
Ashok KharatPudhari
Published on
Updated on

नगर: तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेला भोंदू अशोक खरात याचे नाव चार्जशीटमधून वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2022 मध्ये दाखल या गुन्ह्यातील इतर तीन आरोपींविरुद्ध न्यायालयात चार्जशीट मात्र दाखल झाले आहे. शिर्डी संस्थानमधील कर्मचारी विकास दिवटे यांनी 2022 मध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये खरातसह इतर आरोपींची नावे नमूद होती.

Ashok Kharat
Maharashtra Banana Farmers Crisis: केळी उत्पादक शेतकरी संकटात; दोन रुपये किलो भावाने विक्री

त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून खरातसह चौघांवर गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे चार्जशीट कोर्टात दाखल करण्यात आलेले आहे. मात्र त्यातून खरातचे नाव का वगळण्यात आले, याची चौकशी सुरू असल्याचे समजते. दरम्यान, शिर्डी पोलिसात दाखल गुन्ह्यात भोंदू अशोक खरातचा ताबा मिळावा यासाठी हालचाली सुरू आहेत. नाशिकमधील गुन्ह्यांचा तपास संपल्यानंतर किंवा त्यापूर्वीच खरातचा ताबा मिळावा यासाठी शिर्डी पोलिसांकडून एसआयटीला पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे समजते.

Ashok Kharat
Parner Credit Society Profit: पारनेर पतसंस्थेची भरारी; 5.32 कोटींचा नफा, ठेवी 251 कोटींवर

शिर्डी पोलिसांनीच सर्वांत अगोदर खरातच्या काळ्या कृत्याचा भांडाफोड केला. तब्बल महिनाभर अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास करत खरातचे कारनामे उघड केले. त्यानंतर नाशिकमध्ये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत त्यास अटक केली गेली. आता शिर्डी पोलिसांना खरातचा ताबा मिळाल्यानंतर लैंगिक शोषण व फसवणुकीच्या गुन्ह्यासंदर्भाने आणखी चौकशी केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Ashok Kharat
Shrirampur Law And Order: श्रीरामपूरमध्ये तणाव वाढला; आमदारांचा पोलिसांना इशारा

‌‘ते‌’ चौघे साक्षीदार

खरातने शिर्डीत रावसाहेब गोंदकर यांची चार एकर जमीन लबाडीने खरेदी केली. मुद्दल आणि व्याज दिल्यानंतर खरेदी पलटविण्याचे ठरूनही खरातने व्यवहार पूर्ण केला नाही. या सर्व व्यवहाराला शिर्डीतील सचिन वाणी, प्रभाकर गुंजाळ, भाऊसाहेब चौधरी व जितेंद्र शेळके हे साक्षी असल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी त्यांचे जबाबही घेतलेले आहेत. या चौघांचा प्रत्यक्ष व्यवहारात सहभाग नसल्याने त्यांची भूमिका साक्षीदार म्हणून महत्त्वाची ठरेल, असे कायदेतज्ज्ञ सांगत आहेत.

Ashok Kharat
Ahilyanagar Jal Jeevan Yojana: जलजीवन योजनेत गोंधळ; 918 कोटी खर्चूनही हस्तांतरणावर प्रश्नचिन्ह

फेरतपास करून पुरवणी चार्जशीट?

शिर्डी संस्थानमधील काही अधिकाऱ्यांवर दबाव टाकत खरातने हस्तक्षेप केल्याचे आरोप त्या वेळी झाले होते. मानसिक त्रासामुळेच विकास दिवटे यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्या वेळी करण्यात आला होता. इतका गंभीर आरोप असतानाही खरातविरुद्ध चार्जशीट दाखल का केले गेले नाही? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पोलिस या गुन्ह्याचा फेरतपास करून पुरवणी दोषारोप दाखल करतील का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्या वेळी चार्जशीट दाखल न करण्यामागे त्याला वाचविण्याचा प्रयत्न होता का? याचीही चौकशी केली जाणार आहे. तसे असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की कसे? हे तपासानंतरच कळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या 2022 मधअये दाखल गुन्ह्याची माहिती घेतली जात आहे. गुन्ह्याचा फेरतपास केला जाईल. त्यातून जे समोर येईल, त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news