Census 2027 Digital: जनगणना 2027 डिजिटल पद्धतीने; अहिल्यानगरमध्ये 10.70 लाख घरांची यादी

1 ते 15 मे स्वयंगणना सुविधा; 16 मेपासून प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू
Census
CensusPudhari
Published on
Updated on

नगर: जिल्ह्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची पूर्वतयारी जोमात सुरू असून, अहिल्यानगर महापालिका कार्यक्षेत्र वगळून घरगणनेसाठी जवळपास 10 लाख 70 हजार घरांची यादी निश्चित करण्यात आली आहे. जनगणना-2027 आता नव्या डिजिटल स्वरूपात राबविण्यात येत असून, त्यामुळे नागरिकांसाठी 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वयंगणना सुविधा उपलब्ध केली आहे. 16 मे ते 14 जून या दरम्यान प्रगणकांकडून प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण केले जाणार आहे.

Census
Ahilyanagar Heatwave: अहिल्यानगरमध्ये 41°C तापमान; उष्णतेच्या लाटेचा जनजीवनावर परिणाम

1872 पासून जनगणनेची परंपरा सुरू आहे. 2027 ची जनगणना 1872 नंतरच्या मालिकेतील 16 वी व स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना आहे. जनगणना-2027 ही दोन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी व घरगणना करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडणार आहे.

Census
Shrirampur Baba Assault: श्रीरामपूरमध्ये भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार; प्रसादातून गुंगी देत अत्याचार

पहिल्या टप्प्यातील घरयादी तयार करण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्र वगळून 6 हजार 870 घरगट तयार करण्यात आले असून, प्रत्येक गटात साधारण 150 ते 180 घरांचा समावेश आहे. एकंदरीत 10 लाख 70 हजार घरे आहेत.

Census
Ashok Kharat: ‘समता’ पतसंस्थेवर सहकार विभागाचा शिक्का; KYC चौकशी सुरू

जनगणनेसाठी यंत्रणा कार्यरत करण्यात आली असून, सुमारे 6 हजार 869 प्रगणक व 1 हजार 145 पर्यवेक्षक असे एकूण 8 हजार 14 कर्मचाऱ्यांची, तसेच याव्यतिरिक्त 10 टक्के अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. डिजिटल माध्यमाचा अधिकाधिक वापर करून स्वयंगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

Census
Nevasa IPL Betting: नेवासा तालुक्यात आयपीएल सट्टेबाजीचे जाळे; तरुणांचे भविष्य धोक्यात

33 प्रकारच्या प्रश्नांची विचारणा

जनगणनेची माहिती प्रथमच डिजिटल माध्यमातून संकलित केली जा णार आहे. त्यासाठी नागरिकांना स्वयंगणनेसाठी संकेतस्थळावर 1 ते 15 मे या कालावधीत सुविधा उपलब्ध केली आहे. या पोर्टलवर इंग्रजी, हिंदीसह इतर 14 भाषांमध्ये माहिती भरण्याची सुविधा आहे. क्षेत्रीय स्तरावर घरगणना करताना प्रगणकांकडून नागरिकांना सुमारे 33 प्रकारचे प्रश्न विचारले जाणार असून, यामध्ये घरांची संख्या, घरांचा प्रकार, कुटुंबाची माहिती तसेच सामाजिक व आर्थिक बाबींचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news