Ahilyanagar Bhingar Leopard: अहिल्यानगरच्या भिंगार येथे बिबट्याने धुमाकूळ; वन विभागाने पकडले

घराच्या बाथरूममध्ये बिबट्याचे प्रवेश, १.५ तासानंतर यशस्वीपणे पकड; नगर तालुक्यात वारंवार बिबट्याचे दर्शन
Bhingar Leopard
Bhingar LeopardPudhari
Published on
Updated on

नगर तालुका: अहिल्यानगर शहराजवळ भिंगार येथे वडारवाडी परिसरात सोमवारी (दि.16) सकाळी बिबट्याने धुमाकूळ घातला. एका घराच्या बाहेर दरवाजा नसलेल्या बाथरूममध्ये शिरलेल्या या बिबट्याला दीड तासाच्या प्रयत्नांनतर बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आले. मात्र तोपर्यंत बिबट्याला पाहण्यासाठी झालेली गर्दी आणि बिबट्यालाही नियंत्रणात आण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

Bhingar Leopard
Ahilyanagar Illegal Water Lifting: पिंपळगाव माळवी तलावातील अवैध पाणी उपशामुळे ग्रामस्थांत चिंता

भिंगारच्या वडारवाडी परिसरात सोमवारी सकाळी बिबट्याने दर्शन दिले. त्यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. तातडीने वन विभागाला कळविण्यात आले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या इकडेतिकडे पळत असतानाच बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घरांच्या गच्चीवर आणि रस्त्यावरही मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे बचाव कार्यात सुरुवातीला अडथळे येत होते; मात्र पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Bhingar Leopard
Mula Dam Water Storage: मुळा धरणात ८३ टक्के पाणीसाठा; नगर दक्षिणेसाठी दिलासा

दरम्यान, हा बिबट्या आलमगीर रोडवरील छत्रपती संभाजीराजे चौक भागातील अका घराबाहेरच्या बाथरूममध्ये शिरला. त्या बाथरूमला दरवाजा नव्हता. वन विभागाच्या पथकाने शिताफीने जाऊन या बाथरूमला दरवाजा म्हणून जाळ्या लावल्या. त्याच्या आत बिबट्याही लपून बसला. नंतर महत्‌‍प्रयासाने वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन दिले. त्यात बेशुद्ध झालेल्या बिबट्याला लावलेल्या जाळीतच पकडण्यात यश आले.

Bhingar Leopard
Ahilyanagar Revenue Collection Target: अहिल्यानगर महसूल वसुलीला मोठे आव्हान; ३७१ कोटींपैकी फक्त ३४ टक्केच जमा

भिंगार पोलिस, एलसीबीचीही मदत

भिंगार पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. एलसीबीचे पथकही भिंगारमध्ये दाखल झाले होते. वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, वनपाल मनेष जाधव, वनरक्षक नितीन गायकवाड, अर्जुन खेडकर, अशोक गाडेकर, विजय चेमटे बिबट्याला पकडण्यासाठी दाखल झाले. सर्वांनी मिळून बिबट्याला जेरबंद केले.

चार बिबट्यांचे जेऊर परिसरात दर्शन

गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये बिबट्यांचे अनेक वेळा दर्शन झाले आहे. नगर तालुक्यात जेऊर, चास, कामरगाव, निंबळक, इसळक, हिंगणगाव, खडकी, बाबुर्डी बेंद, खारे कर्जुने परिसरात अनेक वेळा बिबट्याने दर्शन दिले आहे. तसेच पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्यामुळे या गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. चार दिवसांपूर्वी जेऊरला चापेवाडी, डोंगरगण रस्त्याला खिंड परिसरात नागरिकांनी चार बिबटे पाहिले होते. दरम्यान, वन विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Bhingar Leopard
Nashik Pune Rail Route Controversy: संगमनेर रेल्वे मार्गावरून थोरातांचा सवाल; विखे पाटीलांनी नकाशा जाहीर करावा

अहिल्यानगरच्या वेशीवर धडक!

भिंगार शहरात बिबट्या आल्याची बातमी शहरभर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे परिसरातील शाळा सोडून देण्यात आल्या. भिंगार शहरात बिबट्या येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असताना व पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडत असताना भिंगार परिसरात बिबट्याचा मानव वस्तीत वावर आढळला आहे. यापूर्वी सावेडी उपनगरात बिबट्या दिसल्याच्या अफवा पसरल्या. पण आता भिंगारमध्ये बिबट्या पकडल्याने अहिल्यानगर शहराच्या वेशीवरच त्याने दस्तक दिल्याचे मानले जात आहे. यापूर्वी तपोवन रोड, केडगाव, बोल्हेगाव परिसरामध्येही बिबट्यांचा वावर आढळून आला होता. वेळीच बंदोबस्त केला नाही, तर बिबट्याचा वावर अहिल्यानगर शहरात सुरू होण्यास वेळ लागणार नाही, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news