Ahilyanagar Illegal Water Lifting: पिंपळगाव माळवी तलावातील अवैध पाणी उपशामुळे ग्रामस्थांत चिंता

जेऊर ग्रामपंचायतीची महापालिकेकडे कारवाईची मागणी; तलावातील पाणी पिण्यासाठी राखीव न ठेवल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईचा धोका
Ahilyanagar Illegal Water Lifting
Ahilyanagar Illegal Water LiftingPudhari
Published on
Updated on

नगर तालुका: नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावातील अवैध पाणी उपसा तत्काळ बंद करा, तसेच पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवा. उन्हाळ्यात परिसरातील गावांची पाण्यासाठी वणवण भटकंती होत असते. त्यामुळे तत्काळ तलावातील अवैध पाणी उपसा बंद करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जेऊर ग्रामपंचायतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच जेऊर ग्रामसभेत तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा ठराव घेण्यात आला होता. परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे तलावातून अवैध पाणी उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.

Ahilyanagar Illegal Water Lifting
Mula Dam Water Storage: मुळा धरणात ८३ टक्के पाणीसाठा; नगर दक्षिणेसाठी दिलासा

शुक्रवारी (दि.23) जेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांना पिंपळगाव माळवी तलावातील पाणीसाठ्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. तलावामधून बेसुमार अवैध पाणीउपसा होत असून तो तत्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली होती. पिंपळगाव माळवी तलावातून पिण्याच्या पाण्यासाठी जेऊर, डोंगरगण, धनगरवाडी, मांजरसुंबा या गावांना जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. अनेक वर्षांपासून या गावांना पिंपळगाव माळवी तलावातून पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु सद्यस्थितीत तलावामधून मोठ्या प्रमाणात अवैध पाणी उपसा सुरू आहे.

Ahilyanagar Illegal Water Lifting
Ahilyanagar Revenue Collection Target: अहिल्यानगर महसूल वसुलीला मोठे आव्हान; ३७१ कोटींपैकी फक्त ३४ टक्केच जमा

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असतो. दरवर्षी तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी करावी लागते. अनेक शेतकरी तलावातून जलवाहिन्या टाकून पाणी उपसा करीत असल्याची ही माहिती स्थानिकांंकडून मिळाली.

Ahilyanagar Illegal Water Lifting
Nashik Pune Rail Route Controversy: संगमनेर रेल्वे मार्गावरून थोरातांचा सवाल; विखे पाटीलांनी नकाशा जाहीर करावा

उन्हाळ्यात परिसरातील गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवते. पिंपळगाव माळवी तलावात पाणी असल्यास परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळतो. परंतु तलावातील बेसुमार पाणी उपशामुळे परिसरातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.

पिंपळगाव माळवी तलावातील पाणी उपसा बंद करावा. तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवा. तसेच अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जेऊर, धनगरवाडी परिसरातून करण्यात आली आहे.

Ahilyanagar Illegal Water Lifting
Ahilyanagar BJP Protest: अहिल्यानगरमध्ये भाजपचा निषेध आंदोलन; हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून संताप

कारवाई करण्याची मागणी

अनेक वर्षांपासून पिंपळगाव माळवी तलावातून जेऊर सह परिसरातील गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पिंपळगाव माळवी तलावातील अवैध पाणी उपशामुळे उन्हाळ्यात जेऊर परिसरातील वाड्या वस्त्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती होते. त्यामुळे तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याची गरज आहे. अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी जेऊर ग्रामस्थांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news