Ahilyanagar Revenue Collection Target: अहिल्यानगर महसूल वसुलीला मोठे आव्हान; ३७१ कोटींपैकी फक्त ३४ टक्केच जमा

दहा महिन्यांत केवळ १२३ कोटींची वसुली; मार्चअखेर २४८ कोटी जमा करण्याचे लक्ष्य, महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ वाढली
Revenue Collection
MoneyPudhari
Published on
Updated on

नगर: शासनाने महसूल विभागाला यंदा 371 कोटी 83 लाख रुपयांचा महसूल वसूल करण्याचे टार्गेट दिलेले आहे. गेल्या दहा महिन्यांत फक्त 34 टक्के म्हणजे 123 कोटी 44 लाख 78 हजार रुपयांचा महसूल शासन तिजोरीत जमा झाला आहे. मार्चअखेरपर्यंत 248 कोटींचा महसूल जमा करण्याचे आव्हान आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दोन महिन्यांत चांगलीच दमछाक होणार आहे.

Revenue Collection
Nashik Pune Rail Route Controversy: संगमनेर रेल्वे मार्गावरून थोरातांचा सवाल; विखे पाटीलांनी नकाशा जाहीर करावा

राज्य शासनाकडून दरवर्षी जिल्हा महसूल यंत्रणेला महसूल वसुलीचे टार्गेट दिले जात आहे. गेल्या दीड दोन वर्षांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि इतर विकासकामांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शासकीय तिजोरीत महसूल आवक वाढविण्यासाठी यंदा अधिकचा महसूल प्राप्तीसाठी महसूल वसुलीचे टार्गेट वाढविण्यात आले. त्यानुसार जिल्हा महसूल विभागाला गेल्या वर्षीच्या तुलनेत 154 कोटींचे टार्गेट वाढवून देण्यात आले आहे. त्यामुळे 2025-26 या आर्थिक वर्षात महसूल विभागाला 371 कोटी 83 लाख रुपयांचे उदृिष्टे देण्यात आले. यामध्ये 131 कोटी 83 लाख रुपये जमीन महसूल तर 240 कोटींच्या गौण खनिज महसूल वसुलीचा समावेश आहे.

Revenue Collection
Ahilyanagar BJP Protest: अहिल्यानगरमध्ये भाजपचा निषेध आंदोलन; हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून संताप

महसूल विभागाने 31 जानेवारी 2026 पर्यंत 123 कोटी 44 लाख 78 हजार रुपयांचा महसूल वसूल केला आहे. एकूण टार्गेटच्या तुलनेत वसुलीची टक्केवारी 34 टक्के इतकी आहे. यामध्ये 26 कोटी 56 लाख 97 हजार रुपये जमीन महसूलच्या माध्यमातून तर 96 कोटी 77 लाख 81 हजार रुपये गौण खनिज विभागाच्या वसुलीचा समावेश आहे.

Revenue Collection
Ahilyanagar ATS Raid: अहिल्यानगरमध्ये एटीएसचे १२ ठिकाणी छापे, शस्त्रे व कागदपत्रे जप्त

शासनाने दिलेले टार्गेट शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडलाधिकारी व तलाठी यांची महसूल वसुलीसाठी धावपळ सुरु आहे.

Revenue Collection
Jamkhed MD Drugs Seizure: जामखेडमध्ये ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; ग्रामीण भागात अमली पदार्थांचे जाळे

गेल्या वर्षी 87 टक्के वसुली

गेल्या वर्षी 2024-25 या आर्थिक वर्षात 217 कोटी 31 लाख 49 हजार रुपये महसूल वसुलीचे टार्गेट होते. महसूल यंत्रणेकडून 87 टक्के म्हणजे 187 कोटी 68 लाख 87 हजार एवढा महसूल शासन तिजोरीत जमा झाला होता. वाळूलिलावास प्रतिसाद मिळत नसल्यामुळे 175 कोटींपैकी गौण खनिज विभागाला फक्त 137 कोटी 17 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. यंदा शासनाला गौण खनिजातून 240 कोटींचा महसूल अपेक्षित आहे. परंतु यंदाही वाळूलिलावाला प्रतिसाद मिळत नसल्याची परिस्थिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news