Adhala Dam Water: आढाळा धरणाचे पहिले आवर्तन सुरू; पाणी बचतीसाठी शेतकऱ्यांना आवाहन

धरणात १००१ दलघफू पाणीसाठा; १५ ते १६ गावांना सिंचनासाठी पाणी, दुहेरी लाभक्षेत्रातील गावांबाबत योग्य नियोजनाची मागणी
Adhala Dam
Adhala DamPudhari
Published on: 
Updated on: 

अकोले/देवठाण: तालुक्यातील आढाळा धरणाचे पहिले आवर्तन काल सोमवारी (दि.१६) सकाळपासून सोडण्यात आले आहे, अशी माहिती गणोरे व चिकणी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी दिली. यंदाच्या उन्हाळ्यात रब्बी पिकाऐवजी चारा पिकांवर जास्तीत जास्त भर शेतकऱ्यांनी द्यावा व उभ्या पिकांना पाण्याचा वापर करावा, असेही पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले आहे.

Adhala Dam
Jamkhed Ujani Water Project: जामखेडकरांना उजनीचे पाणी मिळण्यासाठी आणखी वर्षभर प्रतीक्षा!

सध्या धरणात १००१ दलघफू पाणी शिल्लक असून उजव्या कालव्याला २० क्युसेस व व डाव्या कालव्याला १५ क्युसेसने सोडण्यात आले आहे. अनेक गावांचा शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न याच आढळा धरणावरव अवलंबून आहे. गणोरे, विरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, पिंपळगाव, देवठाण, वरखडवाडी, दोडक नदी तसेच सायखिंडी, निमगाव भोजापूर, चिकणी व वेल्हाळे, सावरगाव पाट, समशेरपुर व घोडसरवाडी या सर्व गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा याच धरणातून केला जातो.

Adhala Dam
Ahilyanagar Municipal Corporation: प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्र खासगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव; मनपाच्या स्थायी समितीत आज निर्णय?

तसेच अकोले तालुक्यातील सात व संगमनेर तालुक्यातील आठ अशा १५-१६ गावांना या धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या धरणाचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्व मानले जात आहे.

Adhala Dam
Kukdi Water Project: कुकडीच्या पाण्यावर खासगी उद्योगांचा डोळा? शेतकरी संघर्षासाठी सज्ज!

निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील संगमनेर तालुक्यातील अनेक गावे दोन्हीकडे म्हणजे आढळा धरणाच्या लाभक्षेत्रात सुद्धा आहेत. अशा गावांना आढळा धरणाचे पाणी किंवा निळवंडे धरणाचे पाणी यापैकी कोणते एकच पाणी शेतीसाठी देण्यात यावे, म्हणजे आढाळा धरणाच्या पाण्याची मोठी बचत होईल व लाभक्षेत्रातील गावांना त्याचा उन्हाळ्यात मोठा प्रमाणात उपयोग होईल.

Adhala Dam
Sugarcane Price Protest: उसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर द्या! राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली २३ नोव्हेंबरला मोर्चा

त्यामुळे पाटबंधारे खात्याने योग्य नियोजन करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा अकोले तालुका शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शिवाजी पाटोळे व केशव बोडके आणि इतरांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.