Sugarcane Price Protest: उसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर द्या! राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली २३ नोव्हेंबरला मोर्चा

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा; कमी दर देणाऱ्या कारखान्यांकडून फरकाची रक्कम वसूल करण्याची मागणी
Sugarcane
SugarcanePudhari
Published on: 
Updated on: 

नगर: उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २३ नोव्हेंबर रोजी जिल्‍हाभरातील शेतकरी संघटना व ऊस उत्‍पादक शेतकर्‍यांच्‍या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Sugarcane
Shrirampur Water Supply: श्रीरामपूरकरांना मोठा दिलासा! ८ दिवस दररोज पाणीपुरवठा; त्यानंतर आठवड्यातून तीन दिवस पाणी

साखर कारखाने सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी अद्याप जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाचा दर जाहीर केलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. उसाचा दर जाहीर करण्यासाठी संघटनेने आतापर्यंत कारखान्यांना वारंवार निवेदने दिली. रास्‍ता रोको, गाळप बंद पाडणे, महामार्ग अडविणे आदी विविध प्रकारचे आंदोलने केली. तसेच पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत झालेल्या बैठकांमधूनही प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही दराबाबत ठोस निर्णय झालेला नाही.

Sugarcane
Shrigonda Cotton Mill Fire: श्रीगोंद्यात कापूस जिनिंग मिलला भीषण आग; चार कोटींच्या कापसाच्या गाठी जळून खाक!

कारखानदारांच्या भूमिकेत बदल झालेला नाही. त्यामुळे २३ नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्‍वाखाली जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालून ऊसदराच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली जाणार आहे. उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर, कमी दर जाहीर केलेल्या कारखान्यांकडून फरकाची रक्कम, साखर उताऱ्याच्या प्रश्नाची चौकशी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्‍याचे पदाधिकार्‍यांनी म्‍हटले.

Sugarcane
Nashik Pune Railway Project: नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प पुन्हा चर्चेत; आमदार सत्यजीत तांबे आक्रमक, जनसुनावणीची मागणी!

रक्ताचे पाणी करून आणि लाखो रुपये खर्च करुन शेतकर्‍यांनी ऊस पिकवायचा अन घामाचा योग्य मोबदला मागणीसाठी साखर कारखानदारांच्या दारात उभे राहायचे, ही व्यवस्था आता खपवून घेतली जाणार नाही असा इशारा संघटनांच्‍यापदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत दिला. साखरेचे दर प्रतिकिलो ५४ रुपयांपर्यंत पोहोचला असताना ऊस उत्पादकांना मात्र योग्य दर देण्यास कारखानदार तयार नाहीत. शेतकऱ्यांच्या कष्टाची लूट सुरू असताना सरकार आणि लोकप्रतिनिधीही मूग गिळून बसले आहेत, असा आरोप करीत आता भगतसिंग-राजगुरूंसारखा संघर्षाचा मार्ग स्वीकारून साखरसम्राटांविरोधात लढावे लागेल, अशी आक्रमक भूमिका पदाधिकार्‍यांनी व्‍यक्‍त केली. एफआरपी, साखर उताऱ्याची चोरी, इथेनॉल उत्पादन आदींवरील गैरकारभारावर पदाधिकार्‍यांनी जोरदार टीका केली. या पत्रकार परिषदेला रावसाहेब लवांडे, रवी मोरे, सुरेश ताके, अभिजीत पोटे आदी विविध शेतकरी संघटनांचेपदाधिकारी उपस्‍थित होते.

Sugarcane
Ahilyanagar Farmers Compensation: अहिल्यानगरच्या अडीच लाख शेतकऱ्यांची दिवाळी अग्रिमविनाच; पाच हजारांच्या मदतीची प्रतीक्षा!

विश्रामगृहातील सभागृहच मिळवून दिले नाही

ऊसदराच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी शासकीय विश्रामगृहात आले. मात्र, त्‍यांना सभागृह उपलब्‍ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्‍या पदाधिकाऱ्यांनी चक्क जमिनीवर बसून पत्रकारांशी संवाद साधला. शेतकर्‍यांच्‍या पैशातून उभारलेल्‍या विश्रामगृहात साधी खोली मिळत नसेल, तर शेतकर्‍यांचे यापेक्षा दुर्दैव काय? असा गंभीर आरोप स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र मोरे यांनी केला.

..मग येथे का नाही?

कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत उसाला तुलनेने अधिक दर मिळत आहे. इतर जिल्ह्यांत ४२०० रुपयांच्‍या आसपास दर मिळत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून दर कमी का दिला जात आहे, असा सवालही विविध शेतकरी संघटनांच्‍या पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला आहे. कारखान्यांच्या कर्जाचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना कमी दर देणे अन्यायकारक अशी प्रतिक्रियादेखील त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.