Kukdi Water Project: कुकडीच्या पाण्यावर खासगी उद्योगांचा डोळा? शेतकरी संघर्षासाठी सज्ज!

डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी आंदोलनाची तयारी; शेतकऱ्यांच्या पाणीहक्कासाठी सर्वपक्षीय कृती समिती उभारणार
Kukdi Water Project Farmer Meeting
Kukdi Water Project Farmer MeetingPudhari
Published on: 
Updated on: 

कर्जत: कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर आता खासगी उद्योगांचा डोळा असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीत दुसरीकडे वळवू देणार नाही, असा आक्रमक निर्धार कुकडी पाणी हक्क कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. "शेतकऱ्यांनो जागे व्हा! कुकडीच्या पाण्यावर आता खासगी उद्योगांचा डोळा आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याचा एक थेंबही देणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू," असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी दिला.

Kukdi Water Project Farmer Meeting
Sugarcane Price Protest: उसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर द्या! राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली २३ नोव्हेंबरला मोर्चा

कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. बैठकीस ज्येष्ठ नेते ॲड. कैलास शेवाळे, शांतीलाल कोपनर, सभापती काकासाहेब तापकीर, अशोक जायभाय, भीमराव निकत, अशोक जगताप, चंद्रस थोरात, अंगद रुपनर, पिंटू पाटील, सतीश सुद्रिक, चिंतामणी मुरकुटे, श्रीकाळे, माजी प्राचार्य दत्तात्रय भांडवलकर, माणिक जायभाय यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Kukdi Water Project Farmer Meeting
Shrirampur Water Supply: श्रीरामपूरकरांना मोठा दिलासा! ८ दिवस दररोज पाणीपुरवठा; त्यानंतर आठवड्यातून तीन दिवस पाणी

डिंभे-माणिकडोह बोगदा हा कुकडी प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा विषय असून, या प्रकल्पामुळे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, काही राजकीय विरोधामुळे हा प्रश्न वर्षानुवर्षे रखडल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.

घनश्याम शेलार म्हणाले की, माणिकडोह प्रकल्पातील पाणी सौरऊर्जा प्रकल्पासाठी वळविण्याच्या हालचाली सुरू असल्याचा मुद्दा गंभीर आहे. खासगी वीज प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध झाले, तर कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. आधीच पाण्याच्या टंचाईशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाट्याचे पाणी अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न झाला, तर तो कदापि सहन केला जाणार नाही.

Kukdi Water Project Farmer Meeting
Shrigonda Cotton Mill Fire: श्रीगोंद्यात कापूस जिनिंग मिलला भीषण आग; चार कोटींच्या कापसाच्या गाठी जळून खाक!

विशेष म्हणजे या प्रश्नावर मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि खासदारांनी ठोस भूमिका मांडण्याची गरज असताना त्यांचे मौन आश्चर्यकारक असल्याची टीकाही शेलार यांनी केली. हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून हजारो शेतकरी कुटुंबांच्या जगण्याचा आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ नेते ॲड. कैलास शेवाळे यांनीही या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली. डिंभे धरणातील पाण्यावर कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचाही हक्क आहे. धरण क्षेत्रातील राजकीय प्रभावामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. मंजूर हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. यापुढे हा अन्याय सहन केला जाणार नाही. सरकारला शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी देण्यास भाग पाडण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा त्यांनी दिला.

Kukdi Water Project Farmer Meeting
Nashik Pune Railway Project: नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प पुन्हा चर्चेत; आमदार सत्यजीत तांबे आक्रमक, जनसुनावणीची मागणी!

या बैठकीत केवळ नाराजी व्यक्त न करता आगामी काळातील आंदोलनाची ठोस रणनीती आखण्यात आली. कर्जत तालुक्यातील लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेणे, पाणीप्रश्नाबाबत जनजागृती करणे आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभारणे, असे निर्णय घेण्यात आले. आता पाण्याचा प्रश्न गावोगावी पोहोचणार असून, आगामी काळात या प्रश्नावर मोठे जनआंदोलन उभे राहण्याचे संकेत मिळाले आहेत. बैठकीचे प्रास्ताविक अशोक जायभाय यांनी केले, तर आभार शांतीलाल कोपनर यांनी मानले.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:

  • डिंभे-माणिकडोह बोगदा प्रकल्पासाठी आगामी काळात मोठे आंदोलन उभारणार.

  • कर्जत तालुक्यातील लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात जाऊन जनजागृती बैठका घेणार.

  • पाणीप्रश्नासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करणार.

  • सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा कृती समितीत समावेश करण्याचा प्रयत्न करणार.

  • लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेेण्यासाठी पुढाकार घ्यावा.

  • पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट घेणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.