Bogus Voters List: संगमनेर मतदारसंघात ९५०० बोगस मतदार! थोरातांचा गंभीर आरोप

मतदार याद्यांतील घोळ दुरुस्त करा, मगच स्थानिक स्वराज्य निवडणुका घ्या — माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी
संगमनेर मतदारसंघात ९५०० बोगस मतदार
संगमनेर मतदारसंघात ९५०० बोगस मतदारPudhari
Published on
Updated on

संगमनेर: संगमनेर मतदार संघात ९५०० बोगस मतदार आहेत. पहिल्या मतदार याद्या दुरुस्त करा, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्गीय कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.  (Latest Ahilyanagar News)

संगमनेर मतदारसंघात ९५०० बोगस मतदार
Godavari Bridge: गोदावरी पुलाची दुरवस्था अखेर चव्हाट्यावर! वाहतूक पूर्णपणे बंद

मुंबई येथे महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी संगमनेर मतदार संघातील मतदार यादीवरही भाष्य केले. याप्रसंगी व्यासपीठावर देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, किसान सभेचे अॅड अजित नवले आदी उपस्थित होते.

संगमनेर मतदारसंघात ९५०० बोगस मतदार
Pathardi Robbery Case: भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जण अटकेत

थोरात म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडनुका या बोगस मतदार याद्यांवर झाल्या. आम्ही यावर हरकती घेतल्या. विधानसभेला वापरलेल्या निवडणुक याद्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये वापरू नका, अशी आम्ही मागणी केली. मात्र, या याद्यांच्या हरकतीवर कोणताही निर्णय न घेता त्यांनी एक जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाला ह्या याद्या दिल्या आहेत. माझ्या संगमनेर मतदार संघामध्ये ग्रामीण भागात १५०० बोगस मतदार नोंदणी आहे. शहरात ६०,००० मतदार आहेत. आम्ही हरकती घेतल्या. या मतदार याद्या दुरुस्त झाल्या पाहिजे. तेथे तहसीलदाराने आम्हाला हा दुरुस्तीचा अधिकार नाही, असे लेखी उत्तर दिले. विधानसभेची बोगस मतदार यादी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरली जाईल.

संगमनेर मतदारसंघात ९५०० बोगस मतदार
Ahilyanagar Municipal Election: भाजप, काँग्रेसचे माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या रांगेत; नगर महापालिका निवडणुकीसाठी 200 इच्छुक

निवडणूक आयोगाने पत्र काढले, दुरुस्त्या कराव्यात त्या अगोदर नगरपालिकेच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मागच्या विधानसभेच्या मतदार यादीत प्रचंड घोळ आहे. बोगस मते नोंदविण्यात आली आहे. पहिली मतदार यादी दुरुस्त झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, मतदार याद्या दुरुस्त करा आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्या, अशी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news