Pathardi Robbery Case: भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जण अटकेत

पाथर्डीत भाविकांच्या ट्रॅव्हल्सवरील दरोडा; पोलिसांची २४ तासांत धडक कारवाई
भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जण अटकेत
भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जण अटकेतPudhari
Published on
Updated on

पाथर्डी : नाशिकच्या भाविकांची ट्रॅव्हल्स अडवून लुटणाऱ्या टोळीतील पाच जणांना पोलिसांनी जेरबंद केले. पाथर्डी पोलिसांनी 24 तासांत या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळविले. गुन्ह्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार, दोन मोटारसायकलींसह सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.(Latest Ahilyanagar News)

भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जण अटकेत
Ahilyanagar Municipal Election: भाजप, काँग्रेसचे माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या रांगेत; नगर महापालिका निवडणुकीसाठी 200 इच्छुक

शुभम उर्फ मोन्या उर्फ सावळा संजय भोसले (वय 19), मयुर संजय भोसले (वय 21), राहुल भगवान भोसले (वय 24, सर्व रा. कासारवाडी,पाथर्डी), नीलेश ईलिया बनकर (रा. कंरजी,पाथर्डी), किशोर रामदास वांढेकर (रा.मोहज खुर्द,पाथर्डी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून स्विफ्ट डिझायर (एमएच 12 जीझेड 7359) व स्कॉर्पिओ (एमएच 16 डीएस 1070) जप्त करण्यात आल्या. ही दोन्ही वाहने लखन बाबासाहेब कासार (रा.कासारवाडी) याच्या मालकीचे असल्याचे तपासात समोर आले. त्यालाही आरोपी करण्यात आले असून तो पसार आहे. अटकेतील आरोपींना न्यायालयाने 7 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पसार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मच्छिंद्रनाथ गड मायंबा दर्शनानंतर शनिशिंगणापूरकडे जाणाऱ्या नाशिकच्या भाविकांची ट्रॅव्हल्स शुक्रवारी रात्री त्रिभुवनवाडी-खांडगाव रस्त्यावर अडवून पिस्तुलाचा धाक दाखवत रोकड व सोन्याच्या दागिन्यासह 2 लाख 96 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता.

भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जण अटकेत
Shirdi MIDC Employment: शिर्डी एमआयडीसीत स्थानिकांना रोजगारात प्राधान्य; उद्योगांसाठी 600 एकरावर विकासाची गती

नाशिक येथील पवन सुखदेव खैरनार यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पाथर्डी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या 24 तासांत आरोपींना अटक करत गुन्ह्याची उकल केली.

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डीचे निरीक्षक विलास पुजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक विलास जाधव, संदीप ढाकणे, निवृत्ती आगरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिष भोये, मेढे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन दराडे, बाबासाहेब बडे, दादासाहेब बोरुडे, सुखदेव धोत्रे, भगवान गरगडे, अल्ताफ शेख, नागेश वाघ, पोटभरे, इजाज सय्यद, महेश रुईकर, अक्षय वडते, निलेश गुंड, भगवान टकले, अमोल घुगे, संजय जाधव, अशोक बुधवंत, अक्षय लबडे, कानिफनाथ गोफणे, धनराज चाळक, महिला पोलिस अंजू सानप, उत्कृषा वडते, चालक रविंद्र चव्हाण यांच्या पोलिस पथकाने कौशल्य वापरत चोवीस तासातच हा गंभीर गुन्हा उघडकीस आणला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news