अग्निवीर हिंदू संघटनेकडून पिंपळनेरला 45 गाेवंशना जीवदान

पिंपळनेर : ताहराबादच्या दिशेने निघालेल्या कंटनेरमध्ये आढळलेल्या 45 म्हशी.
पिंपळनेर : ताहराबादच्या दिशेने निघालेल्या कंटनेरमध्ये आढळलेल्या 45 म्हशी.

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

अग्निवीर हिंदू संघटनेने पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी करुन 45 गोवशांना जीवदान दिल्याची घटना घडली आहे. अग्निवीर हिंदू संघटना महाराष्ट्र राज्याच्या गोरक्षकांना मंगळवारी (दि.14) दुपारी 3 वाजता नवापूर पिंपळनेर मार्गावर पिंपळनेर बायपास मार्गावर चारचाकी वाहन (जि जे.18 बिटी.6056) निदर्शनास आले. या वाहनाचा पाठलाग केला असता वाहनात गोरक्षकांना गोवंश असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपळनेर सटाणा मार्गावर वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता भरधाव वाहन ताराहबादच्या दिशेने गेले. गोरक्षकांनी ताराहबाद चौफुलीवर गोरक्षकांनी वाहन थांबवले असता त्याच्या कंटेनरमध्ये 45 जिवंत म्हशी आढळून आल्या. त्यांनी त्वरीत जायखेडा पोलीस ठाणे माहिती कळवली. त्यानंतर अग्निविर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, गुरू पाटील, मयूर कासार, भरत जगताप, पंकज वानखेडे, पियुष कोठावदे, वैभव बच्छाव, राकेश अहिरे, तुका अहिरे, अजय पगारे, मोहन शेवाळे, विशाल गवळे, बंटी शिंदे, शुभम वाघ, गणेश खैरनार, विक्की मुंडा या गोरक्षकांनी गोवंशाना जीवदान देण्यास सहकार्य केले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news