

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ सावदा येथील अपघात दोघे ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजेंद्र भादू डोळे ( वय ४२; पाटीलपुरा सावदा, ता. रावेर) व शेख महेमूद शेख रज्जाक (वय५३ रा सावदा) हे दोघेजण मोटारसायकलवरून जळगावकडे कामानिमित्त येत होते. राष्ट्रीय महामार्ग येथे रेल्वे उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हे दोन्हीजण जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. नशिराबाद पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.