मुंबईतील करीरोड स्टेशनजवळ ६० मजली टॉवरला आग; सुरक्षा रक्षकाचा मृत्यू | पुढारी

मुंबईतील करीरोड स्टेशनजवळ ६० मजली टॉवरला आग; सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

मुंबई;पुढारी ऑनलाईन

मुंबईतील लालबाग मधील वन अविघ्न टॉवरला आग भीषण आग लागली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

आगीचे लाळ पसरल्याने घाबरलेल्या सुरक्षा रक्षकाने १९ व्या मजल्याच्या गॅलरीतून उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. आगीमुळे अनेकजण टॉवरमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

१९ व्या मजल्यावरील एका फ्लॅटचे नुतनीकरण सुरू असताना ही आग लागल्याचे समजते. ही आग आटोक्यात आणली जात आहे. या टॉवरच्या नवव्या मजल्यापर्यंत पार्किंग सुविधा आहे. १० व्या मजल्यापासून रहिवाशी फ्लॅट आहेत.

करीरोड स्टेशनच्या बाजुला असलेल्या या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आग लागली होती. ती आग २५ व्या मजल्यापर्यंत पसरली आहे. या आगीतून जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे. यात एका नागरिकाने इमारतीवरुन उडी मारल्याचे समोर आले आहे. अग्निशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला आहे.

घटनास्थळी आगीचे आणि धुराचे लोळ पसरले आहेत. येथे अनेक इमारती लागून असल्याने आग विझवण्यात अडचणी येत आहेत. पहिल्यांदा १९ व्या मजल्यावर लागलेली आग २५ व्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे.

वाहतूक पोलिस आणि पोलिसांकडून बघ्यांना दुर्घटनास्थळावरून दूर लोटण्याचे प्रयत्न सुरु आहे. लाबागकडून दादरकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे.

‘समीर वानखेडे यांच्या चौकशी बाबत गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले….

आगीचे लोट करीरोडसह लालबाग, चिंचपोकळी आणि परळपर्यंत दिसत आहेत. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून जाणारी वाहने दुर्घटनास्थळी पोहचल्यावर थांबत आहेत. तसेच बहुतेक प्रवासी आणि पादचारी धुराटे लोट मोबाईलमध्ये टिपण्यासाठी थांबत असल्याने अग्निशमन दलासह वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी प्रयत्न करत असून पाण्याचे फवारे इमारतीपर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यामुळे आग विझविण्यात अडचणी येत आहेत.

हेही वाचलत का?

Back to top button