जळगाव : मोलकरणीवर अत्याचार, वकिलाविरूध्द गुन्हा दाखल

जळगाव : मोलकरणीवर अत्याचार, वकिलाविरूध्द गुन्हा दाखल
Published on
Updated on

जळगाव :  पुढारी वृत्तसेवा
घरकाम करणार्‍या मोलकरणीवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणार्‍या वकिलाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश साहेबराव गवई (रा. श्यामनगर) असे त्‍याचे नाव आहे. दरम्यान, या वकिलावर आधी सरकारी अभियोक्ता असतांना 'एसीबी'ने कारवाई देखील केली होती अशी माहिती समोर आली आहे.

राजेश साहेबराव गवई (रा. श्यामनगर) या वकिलाच्या घरी पीडित महिला मोलकरणी म्हणून काम करीत होती. त्याने पीडितेशी प्रेमसंबंध निर्माण केले. पीडितेच्या पतीस देखील त्याने या संबंधांची माहिती दिली. त्यामुळे पतीने पीडितेशी नाते तोडले. त्यानंतर गवईने पीडितेला धमक्या देण्यास सुरुवात केली.त्या महिलेचे आधी चित्रीत केलेले व्हिडीओ व्हायरल करण्‍याची धमकी देवून तिची बदनामी देखील केली.पीडित महिलेने मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गवईच्या विरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार विनयभंग व आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news