धुळे : साक्री नगरपंचायतीसाठी दुपारपर्यंत 40.77 टक्के मतदान

धुळे : साक्री नगरपंचायतीसाठी दुपारपर्यंत 40.77 टक्के मतदान

धुळे : पुढारी वृत्तसेवा

साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज दुपारपर्यंत 40. 77 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत काही मतदानासाठी केंद्रांवर गर्दी दिसून आली.

साक्री येथील नगरपंचायतीच्या 17 पैकी 13 वार्डसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे अन्य चार जागांची निवडणूक प्रक्रिया 18 जानेवारीला होणार आहेत. आज होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली होती.

एकूण तेरा वार्डातील मतदान साठी 14 हजार 447 मतदारांनी आपला हक्क बजावणार आहेत. यात 6162 महिला तर सात हजार 585 पुरुष मतदारांचा समावेश आहे. या मतदारांसाठी शहरातील विविध भागात एकूण सत्तावीस मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. आज सकाळी साडे अकरा पर्यंत एकूण  3,349 मतदारांनी आपला हक्क बजावला. यात 1898 पुरुष तर 1461 महिला मतदारांचा समावेश होता.

सकाळी साडे अकरा पर्यंत 23.25 टक्के मतदान झाले. तर दुपारी 12 नंतर अनेक मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली. दुपारी 40 ते 70 टक्के मतदारांनी मतदान केले होते. यात एकूण पाच हजार 890 मतदारांपैकी 3066 पुरुष 2824 महिला मतदारांनी आपला हक्क बजावला. या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तिहेरी लढतीचे रंगत दिसून आली असून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी आहे. तर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news