नाशिक : निफाडच्या द्राक्षपंढरीला हुडहुडी, पारा ८.५ अंशावर घसरला | पुढारी

नाशिक : निफाडच्या द्राक्षपंढरीला हुडहुडी, पारा ८.५ अंशावर घसरला

उगांव (ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा

नाशिकचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या निफाड तालुक्यात पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी १० अंशावर‌ असलेला पारा सोमवारी (दि. २०) सकाळी ८.५ अंशावर घसरला. अवकाळीनंतर थंडीचे संकट आल्याने द्राक्ष बागायतदारांची चांगलीच कोंडी झाली आहे.

निफाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसा‌न झाले. त्यानंतर‌ लागलीच थंडीची लाट सुरु झाली. त्यामुळे परिपक्व होत असलेल्या द्राक्षमालाची फुगवण थांबणार आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत. थंडीत वाढ झाल्याने वाडी वस्त्यांवर शेकोट्यांभोवती नागरिकांच्या गप्पांसह गरमागरम चहाचे झुरके पहायला मिळत आहे.

द्राक्ष बागायतदारांना सतत वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. गत पंधरवड्यात अवकाळीने फुलोरा अवस्थेतील द्राक्षमालाची मोठ्या प्रमाणात कुज व गळ झाली होती. आता पाणी उतरण्याच्या (परिपक्व होणारे) अवस्थेत असलेल्या द्राक्षमालाच्या आकारमान वाढीला ह्या थंडीचा परिणाम होणार आहे. त्यासाठी पहाटे ठिबकद्वारे पाणी देणेचा पर्याय आहे. मात्र वीज भारनियमनाचे अडचणीचे वेळापत्रक द्राक्ष बागायतदारांसाठी सुलतानी संकट ठरत आहे.

– शिवा ढोमसे, द्राक्ष उत्पादक, उगांव (ता. निफाड)

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : गोदाघाटाची सफर – गोदावरी महोत्सवाच्या निमित्ताने

 

Back to top button