Hemant Godse | काही लोकांनी माझे काम केले नाही, पराभवानंतर हेमंत गोडसेंचा भुजबळांवर निशाणा

Hemant Godse | काही लोकांनी माझे काम केले नाही, पराभवानंतर हेमंत गोडसेंचा भुजबळांवर निशाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- माझा कोणावर रोष नाही. सर्वांनी चांगले काम केले. कोणी काम केले नाही ते सर्वांना माहिती आहे. कोणाची ताकद मिळाली नाही ते सर्वांना ठाऊक आहे, अशा शब्दांत नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारली आहे. सलग दोन वेळा खासदार राहिलेले शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. गोडसे हे तब्बल एक लाख ६२ हजारांच्या फरकाने पराभूत झाले. यानंतर माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आम्हाला कोणाची ताकद मिळाली नाही, हे सर्वांना माहितीय, असे वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे. माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना गोडसे म्हणाले की, मला उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळे हा निकाल आला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या धोरणामुळे ही अनुभूती आली. भाजपने उमेदवार घोषित केले. तेव्हाच पक्षाने उमेदवार देणे गरजेचे होते. विरोधातील उमेदवाराला जास्त दिवस मिळाले. त्यामुळे आम्ही डेमेज झालो. लोकांना गोडसे उमेदवार असणार की, नाही हा संभ्रम निर्माण झाला. त्याचा मला फटका बसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

कोणी काम केले नाही ते सर्वांना माहिती

ते पुढे म्हणाले की, माझा रोष कोणावर नाही. सर्वांनी काही चांगले काम झाले. कोणी काम केले नाही ते सर्वांना माहिती आहे. कोणाची ताकद मिळाली नाही ते सर्वांना माहिती आहे, अशी टीका त्यांनी यावेळी भुजबळांवर नाव न घेता केली आहे. यापुढील काळातही राजकीय काम सुरू ठेवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की, खचून जाऊ नका काम सुरू ठेवा, असेही गोडसे यांनी सांगितले.

महायुतीतील घटक पक्षांमध्ये तणाव

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नाशिकमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्ये तणावाची स्थिती आहे. पराभवाने व्यथित झालेल्या हेमंत गोडसे यांनी अप्रत्यक्षरित्या छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधल्यानंतर भुजबळ समर्थकांकडूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. उमेदवारी जाहीर करण्यात झालेला विलंब तसेच उमेदवाराची निवड करण्यात झालेली चूक पराभवाचे कारण ठरल्याची प्रतिक्रिया देत भुजबळ यांनी गोडसे यांच्यावर पलटवार केला आहे. त्यातच भाजपमध्ये देखील पराभवामागील कारणमिमांसा सुरू झाली असून पराभवाची कारणे महायुतीतल घटक पक्षांमधील दरी वाढविणारी ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news