Jalgaon Crime | सुरक्षारक्षकास मारहाण करुन ऑईल मिल मध्ये लूट, संशयिताला अटक

Jalgaon Crime | सुरक्षारक्षकास मारहाण करुन ऑईल मिल मध्ये लूट, संशयिताला अटक
Published on
Updated on

जळगाव- पाचोरा बाजोरीया मिल येथे सुरक्षा रक्षकास मारहाण करुन जबरी चोरी करणा-या दोन संशयितांना गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली .त्याच्यांकडून 50 हजार रुपये, चाकू, बंदुक,  लायटर जप्त करण्यात आले आहे

पाचोरा येथील हिंद ऑईल मिल, देशमुखवाडी, आशिष जगदीश बाजोरिया (२०) सुमरा ऑइलमिल, बाजोरिया ऑइल रिफायनरी आणि कृषक धान्य व्यापार कारखाना कार्यालय, मोंढाळा रोड, पाचोरा, येथे सुरक्षा रक्षक म्हणून प्रभाकर रामदास पाटील (३०) यांची नियुक्ती करण्यात आली होती. अज्ञात चोरट्यांनी येऊन सुरक्षा रक्षकाचे हात-पाय बांधून त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच रु.500/- च्या चलनी नोटांसह रुपये 4 लाख 05 हजाराची रोकड चोरून नेली. गोदरेज कंपनीची तिजोरीचे रु. सोनेरी कलर बिस्किटे, कागदी वजन म्हणून वापरायची  DVR मशिन किमतीचे 6,000/- . मोबाईल रु.1,000/- एकूण किंमत रु.4, लाख 18 हजार तक्रारदाराच्या संमतीशिवाय बळजबरीने हिसकावून नेण्यात आले. दि. 23 पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.

पाचोरा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटी करण पथकाचे राहुल काशिनाथ शिंपी, योगेश सुरेश पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज व गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषण करुन तसेच त्यांना त्यांचे गुप्तबातमीदारा मार्फत संशयीत आरोपी हे त्यांचे घरी आलेले आहेत अशी माहिती मिळाल्याने आरोपी अल्ताप मसुद खान, वय.31 वर्षे, रा.नुराणीनगर, जारगांव, ता. पाचोरा, जि. जळगांव 2. सरफराज हसन शहा फकीर, वय. 22 वर्षे, रा. मुल्लावाडा, जामनेर रोड, पाचोरा, याचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. साथीदार मुक्तार उर्फ धडया मेहबुब शेख, रा.नुराणीनगर, जारगांव, हा गुन्हा घडले पासुन फरार आहे. सदर वरील दोन्ही आरोपींनी गुन्हयात वापरेलेले पिस्टल सारखे दिसणारे लायटर, एक 12.5 इंच असणारा सुरा (चाकु) व गुन्हयात गेलेले रोख 50, हजार रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे.

हेही वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news