नाशिकमध्ये ७२५ किलो गोवंश मांस जप्त, माहिती मिळताच पोलिसांनी अडवला ट्रक

धानखरेदी गैरव्यवहार
धानखरेदी गैरव्यवहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गोवंश मांसची वाहतूक करणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पकडले आहे. अझहर सफदर खान (३१, रा. वडाळागाव) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पथकाचे अंमलदार तेजस मते यांना मिळालेल्या माहितीनुसार, वडाळागाव परिसरात मांसविक्री करण्यासाठी एमएच ४१ एयु ४०४९ क्रमांकाचा टेम्पो येणार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाचे पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय सानप, मनोहर शिंदे, परमेश्वर दराडे, अंमलदार विशाल कुंवर, समाधान वाजे आदींच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो अडवून तपासणी केली असता त्यात मांस आढळून आले.

सखोल तपासात टेम्पो मालक शोएब समद कुरेशी (रा. वडाळागाव), नाजीर, बबलु कुरेशी व अजीज कुरेशी यांनी टेम्पोत मांस भरून ते विक्री करण्यासाठी पाठवल्याची कबुली अझहरने दिली. पोलिसांनी टेम्पोतून ७२५ किलो वजनाचे मांस जप्त केले. त्यामुळे पोलिसांनी टेम्पोसह मांस असा ६ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित अझहर विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news