Jalgaon Murder | किशोर सोनवणे खूनप्रकरणी चार संशयितांना अटक | पुढारी

Jalgaon Murder | किशोर सोनवणे खूनप्रकरणी चार संशयितांना अटक

जळगाव- शहरातील कालिका माता मंदिर परिसरात हॉटेल भानू येथे दि. 22 मे च्या रात्री जेवण करण्यासाठी आलेल्या किशोर अशोक सोनवणे या तरुणाचा खून झाला. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवून यातील चार संशयित आरोपींना अटक केली व इतर आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.

हॉटेल भानु येथे दि. 22 च्या रात्री किशोर सोनवणे याचा काही जणांनी खून केला. या प्रकरणी प्रबोधन नगर हॉटेल साई पॅलेस मागे राहणारे अशोक श्रावण सोनवणे यांनी सांगितले की, २२ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मुलगा किशोर याचा मित्र अमोल सोनार उर्फ गप्या याचा फोन आला. त्याने सांगितले की, हॉटेल भानू, कालिका माता मंदिराजवळ येथे किशोर ला काही जणांनी मारहाण केली आहे व त्यात तो बेशुद्ध झाला आहे. आणि त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन चाललो आहोत. अशोक सोनवणे हे सिव्हिल हॉस्पिटल येथे गेले.
किशोर सोनवणे व त्याच्या पाच सहा मित्रांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास अमोल सोनार यांच्या घराजवळ जेवणाचा प्रोग्राम ला जायचं प्लॅन केला. हॉटेल भानू येथे जेवण प्लॅन झाल्यानंतर रात्री नऊ वाजता जेवणासाठी गेले. किशोरला कुणाचा तरी फोन आल्यानंतर चायनीजच्या गाडीवरील रुपेश काकडे यांच्याशी वाद झाला. तो वाद सोडवल्यानंतर जेवण करीत असताना दहा ते अकरा जण येऊन किशोर सोनवणे याला लोखंडी दांड्याने व शस्त्राने मारून पळून गेले. किशोर बेशुद्ध झाल्याने त्याला उचलून हॉस्पिटलला आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 गुन्हा दाखल

यामध्ये संशयित आरोपी रुपेश मनोहर सोनार, निलेश उर्फ लोमेश युवराज सपकाळे, आकाश युवराज सपकाळे, मयूर विनोद कोळी, ईश्वर सुभाष काकडे, रुपेश सुभाष काकडे (सर्व रा. मोहन टॉकीज परिसर, आसोदा रोड, जळगाव), दुर्लभ कोळी (सुनसगाव ता. जळगाव) आणि अमोल छगन सोनवणे (श्रीराम कॉलनी, जळगाव) यांच्यासह अनोळखी तीन इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिपेठ पोलिसांनी रात्रभर या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन चार संशयित तरुणांना अटक केली आहे.

यांना केली अटक

प्रशांत सुभाष काकडे (वय ३०), रुपेश सुभाष काकडे (वय २७), ईश्वर सुभाष काकडे (वय २३), मयूर विनोद कोळी ( वय २१, सर्व रा. आसोदा रोड, मोहन टॉकीज जवळ, जळगाव यांना अटक करण्यात आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा –

Back to top button