Nandurbar Lok Sabha Election |खा. डॉ. हिना गावित यांच्या विरोधात आणखी कोण उमेदवार? नंदुरबार मतदार संघात प्रचंड उत्सुकता | पुढारी

Nandurbar Lok Sabha Election |खा. डॉ. हिना गावित यांच्या विरोधात आणखी कोण उमेदवार? नंदुरबार मतदार संघात प्रचंड उत्सुकता

नंदुरबार : निवडून येण्याची हॅट्रिक साधू पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित आणि काँग्रेसचे उमेदवार अॅड. गोवाल पाडवी हे दोनच उमेदवार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात आहेत. यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी दमदार उमेदवार मैदानात उतरणार का? याची शक्यता दिसत नसली तरी खरे चित्र उमेदवारी दाखल करण्याच्या मुदती अखेर म्हणजे 25 एप्रिल रोजीच स्पष्ट होईल, असे दिसत आहे. (Nandurbar Lok Sabha Election)

नंदुरबार लोकसभा निवडणुकीची अधिसूचना काल दिनांक 18 एप्रिल रोजी घोषित झाली त्यानुसार 25 एप्रिल 2024 ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. अधिसूचना काढण्यात आल्याच्या दोन दिवसांत 18 जणांकडून उमेदवारी अर्ज खरेदी झाले. काल दिनांक 18 एप्रिल रोजी नामांकन अर्ज खरेदी करणाऱ्यांमध्ये भाजपाकडून मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार कृष्णराव गावित, भाजपाच्या घोषित उमेदवार खासदार डॉ. हिना विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित, ल्पिपल्स पार्टी ऑफ इंडीया डेमोर्कीटीक कडून निर्मला कागड्या वसावे, काँग्रेसकडून हेमलता के पाडवी, काँग्रेसचे घोषित उमेदवार गोवाल के पाडवी, माजी मंत्री एड. के.सी. पाडवी यांनी, तर अपक्ष म्हणून सुशिलकुमार जहाँगीर पावरा, गोपाल सुरेश भंडारी यांचा समावेश आहे. आज दिनांक 19 रोजी नामांकन अर्ज खरेदी करणाऱ्यांमध्ये नवापूर चे कॉंग्रेसचे आमदार शिरीष नाईक आणि त्यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रजनी नाईक यांचा समावेश आहे. त्याचबरोबर बहुजन मुक्ती पार्टीचे रोहीदास गेमजी वळवी, बसपाकडून आनंदा सुकलाल कोळी, अपक्ष अर्जुन सिंग वसावे आणि अन्य यांचा समावेश आहे. तथापि डॉक्टर हिना गावित यांच्या विरोधात (काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांचा अपवाद वगळता) जोरदार लढत देण्याच्या तयारीत असलेला अन्य उमेदवार मैदानात असल्याचे चित्र त्यातून समोर आलेले नाही.

निवडणूक लागण्याच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीतील अंतर्गत विरोध चर्चेत आणला गेला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः घराणेशाहीचा मुद्दा संपुष्टात आणल्यामुळे तसेच स्वतः अमित शहा यांनी विरोधकांना तंबी दिल्यामुळे बहुतांश प्रमाणात तो विरोध मावळला. लगेच गावित परिवाराच्या विरोधात फोरम स्थापन करणारेही विघटीत झाले. त्यामुळे गावित परिवार विरोधक निष्प्रभ झाले आहेत. तरीही काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या व्यतिरिक्त खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या विरोधात जोरदार लढत देऊ शकणारा आणखी एखादा उमेदवार मैदानात उतरवला जाईल का? याविषयीची उत्सुकता मतदारांमध्ये दिसून येते.

हेही वाचा –

Back to top button