निजामपूर-जैताणे येथे ईद- उल-फितर उत्साहात

निजामपूर-जैताणे येथे ईद- उल-फितर उत्साहात

पिंपळनेर (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा– साक्री तालुक्यातील निजामपूर रमजानचा महीना रोजेदारांसाठी उत्साहात गेल्यावर गुरूवारी निजामपूर-जैताणे येथे ईद- उल-फितर उत्साहात साजरी करण्यात आली. खुडाणे चौफुलीवरील ईदगाह मैदानावर ईद ची नमाज अदा करण्यात आली. मौलाना जुनेद पठाण यांनी नमाज पठण केले. नमाज नंतर कुतबाह पठण करून दुआ मागण्यात आली. जगात शांतता, सुख समृध्दी नांदावी भाई चारा वाढावा यासाठी विषेश दुआ करण्यात आली.

या वेळी ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी प स सदस्य व जैताणे सरपंच प्रतिनिधी अशोक मुजगे, एपीआय हनुमंत गायकवाड, ग्रा प सदस्य राजेश बागुल, ग स बॅंक संचालक प्रकाश बच्छाव, नामदेव पिंपळे उपस्थित होते. मुस्लीम ट्रस्टचे अध्यक्ष आसिफ पठाण, उपाध्यक्ष मुस्ताक पठाण, माजी सरपंच सलीम पठाण, युसुफ सैय्यद, लियाकत सैय्यद, खुदाबक्ष शेख, ताहीर मिर्झा, परवेझ सैय्यद, तनवीर शेख, अकबर पिंजारी, मौलाना सलीम, सज्जाद मिर्झा, जुबेर सैय्यद, मुज़म्मील हक मिर्झा, अर्शद शेख, जुनेद पठाण, फत्तु सैय्यद, सत्तार मणियार, अमीन मनीयार, एकबाल सिकलकर समद खाटीक यांचे सह निजामपूर-जैताणे आखाडे, म्हसाळे वासखेडी येथिल मुस्लीम बांधव उपस्थित होते.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news