Dhule News | बारीपाडा जंगलातील 415 महू वृक्षांच्या फुलांचा लिलाव, बत्तीस वर्षाची परंपरा | पुढारी

Dhule News | बारीपाडा जंगलातील 415 महू वृक्षांच्या फुलांचा लिलाव, बत्तीस वर्षाची परंपरा

पिंपळनेर : (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे वनव्यवस्थापन समिती बारीपाडा अंतर्गत जंगलातील 415 महू फुलांच्या वृक्षांचा लिलाव करण्यात आला. गावातील 50 ते 60 नागरिकांसह वनाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव पवार, सचिव चंदू चौधरी व मोतीराम पवार, बंडू बागूल, सोमनाथ चौर, वसंत भोये, कैलास पवार, बाबूराव पवार, भुन्या पवार, दयाराम पवार, जगन चौरे, किसन भोये, श्रावण पवार, खतू चौरे, शिवा पवार, सोमन चौरे, चैत्राम पवार आदी उपस्थित होते.

या वेळी लिलावासाठी अनेक जण जंगलात गेले होते. एक हजार 100 हेक्टर जंगलात असलेल्या महू वृक्षांच्या फुलांचा लिलाव प्रत्येक महूच्या झाडाजवळ जाऊन त्याची किंमत त्याला आलेल्या बहारावर, आकारावर तसेच या वृक्षापासून उत्पादन(फुले)किती मिळतील त्यावर अवलंबून असते. प्रत्येक महू झाडांची बोली वेगवेगळी असते. त्या लिलावाची सुरुवात 50 रुपयांपासून सुरू होते. आज 50ते 1600 रुपयांपर्यंत लिलाव झाला. सगळ्यात महाग महू वृक्ष दोन हजार रुपयांना गेला.

32 वर्षापासून परंपरा

ग्रामस्थांनी गेल्या 32 वर्षापासून चालत आलेली पंरपरा कायम ठेवली आहे. जंगल क्षेत्रात असलेल्या महू झाडांची लिलाव पद्धत आजही सुरू आहे. त्यात नियम व अटी-शर्ती देखील आहेत.  लिलाव संपल्यानंतर वनभोजनाचा कार्यक्रम होतो व उरलेली रक्कम वनव्यवस्थापन समितीत ठेवली जाते. आज 13 हजार 300 रुपयांचा जंगल परिसरातील महू फुलांच्या 415 वृक्षांचा लिलाव करण्यात आला. वनउपज खरेदी करण्यासाठी वनधन केंद्र असून, जंगलातील वन उपज बारीपाडा, मोहगाव, चावडीपाडा या ठिकाणी खरेदी व विक्री केली जाते.

हेही वाचा –

Back to top button