अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे नाशिकमध्ये पडसाद, आपचे कार्यकर्ते आक्रमक

नाशिक : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ मेहेर चौकात रास्ता राेको करताना आपचे कार्यकर्ते. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ मेहेर चौकात रास्ता राेको करताना आपचे कार्यकर्ते. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर राज्यभरात आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.  नाशिकमध्येही शुक्रवारी (दि. २२) त्याचे पडसाद उमटले.

आप कार्यकर्त्यांनी येथील मेहेर चाैकात अर्धा तास ठिय्या मांडून तसेच टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. 'नही चलेगी नही चलेगी मोदीशाही नही चलेगी', 'नरेंद्र मोदी मुर्दाबाद', 'जब जब मोदी डरता है पुलीस को आगे करता है' यांसारख्या दिलेल्या घोषणांंनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

हिंमत असेल तर पोलिसांनी राज्यातील भ्रष्टाचारी नेत्यांना अटक करावी, असे आव्हान कार्यकर्त्यांकडून देण्यात आले. आपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत थेट मेहेर चाैकात मोर्चा वळविला. कार्यकर्त्यांनी रस्त्यातच ठिय्या मांडत टायर जाळले. परिणामी, मेहेर ते सीबीएस चौक अशी वाहतूक ठप्प झाली. यावेळी शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निषेधाचे निवेदन दिले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news