Gondia News: गोरेगाव येथे रुग्णालयावर छापा; बोगस डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

Gondia News: गोरेगाव येथे रुग्णालयावर छापा; बोगस डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : शासकीय मान्यताप्राप्त कुठलाही वैद्यकीय परवाना नसताना रुग्णालय सुरू करुन रुग्णांवर उपचार करणार्‍या बोगस डॉक्टराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉ. नितेश बाजपेयी असे त्या बोगस डॉक्टराचे नाव आहे. ही कारवाई गोरेगाव येथे करण्यात आली. Gondia News

जिल्हा शल्य चिकित्सक यांना गोरेगाव येथे एक बोगस डॉक्टराकडे कुठलेही शासन मान्यता प्राप्त वैद्यकीय परवाना नसताना (विना रजिस्ट्रेशन) हॉस्पिटल चालवत आहे. अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या टीमसोबत गोरेगाव पोलीस पथक गोरेगाव येथील डॉ. नितेश बाजपेयी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांनी दवाखाना रजिस्ट्रेशन परवानाबाबत विचारले असता नर्स स्टाफकडून कोणत्याही प्रकारचा रजिस्ट्रेशन परवाना नसल्याबाबत सांगितले. तसेच उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. Gondia News

विशेष म्हणजे, हॉस्पिटल मध्ये एक महिला ऍडमिट असून तिच्यावर विना पात्रता धारक डॉक्टर द्वारे औषधोपचार सुरू होते. तसेच हॉस्पिटल बाबत कोणतेही प्रकारचे रजिस्ट्रेशन झाले नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक, गोंदिया यांनी सांगितले. वैद्यकीय अधीक्षक, गोरेगाव डॉ. विजय पटले यांनी दोन शासकीय पंचासमक्ष रीतसर कायदेशीर कारवाई केली. हॉस्पिटल व त्यातील डॉक्टर बोगस असल्याने गोरेगाव वैद्यकीय अधीक्षक डॉ. पटले यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोरेगाव येथे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजित घोलप करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button