धुळ्याच्या विटा भट्टी परिसरात मतदार जनजागृती कार्यक्रम | पुढारी

धुळ्याच्या विटा भट्टी परिसरात मतदार जनजागृती कार्यक्रम

धुळे  पुढारी वृत्तसेवा- मतदार जनजागृती कार्यक्रमांनुसार काल विटा भट्टी परिसर व जय भोले मित्र मंडळ झोपडपट्टी भाग देवपूर धुळे येथे मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी धुळे शहर मतदारसंघाच्या सहायक निवडणुक निर्णय अधिकारी सीमा अहिरे, अपर तहसिलदार वैशाली हिंगे, स्वीप नोडल अधिकारी तथा नायब तहसिलदार मनोज जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

धुळे शहरातील विटाभट्टी परिसर व जय भोले मित्र मंडळ झोपडपट्टी भागात गत लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी कमी आढळून आल्याने अशा भागावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. याठिकाणी मतदारामध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी शाहीर सुभाष कुलकर्णी यांनी पोवाड्यांच्या माध्यमातून मतदाराचे प्रबोधन कार्यक्रम सादर करुन मतदानासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी संरक्षण अधिकारी राकेश नेरकर, संदीप मोरे उपस्थित होते. येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याचे स्वीप नोडल अधिकारी तथा परिविक्षाधिन नायब तहसिलदार मनोज जमदाडे यांनी कळविले आहे.

Back to top button