Nashik Crime News : सामनगावला रात्री घरात घूसून महिलेचा खून, गळ्यावर केले वार | पुढारी

Nashik Crime News : सामनगावला रात्री घरात घूसून महिलेचा खून, गळ्यावर केले वार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- एकलहरे येथील सामनगाव येथे महिलेचा निर्घुण खून केल्याची घटना रात्री साडेदहा वाजता घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांती सुदाम बनेरिया असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला मूळची उत्तर प्रदेश येथील असून, सध्या सामनगाव येथे राहत होती. रात्रीच्या वेळी तिच्या घरात शिरून अज्ञात व्यक्तीने तिच्या गळ्यावर काहीतरी हत्याराने वार करुन खून केला. (Nashik Crime News)

स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याची संपर्क साधून माहिती दिली. माहिती कळताच घटनास्थळी उपायुक्त मोनिका राऊत, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व गुन्हे शाखेच्या पथकाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सदर ठिकाणी महिला मृत अवस्थेत आढळून आली. महिलेच्या गळ्यावर काहीतरी धारदार वस्तूने वार करून निर्घुण हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान महिलेचा खून अद्याप कोणत्या कारणावरून झाला आणि कोणी केला याबाबतची माहिती अद्याप नाशिक रोड पोलिसांकडून मिळाली नाही. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी घेत आहे.

हेही वाचा :

Back to top button