Alibaba Ani Chalishitale Chor : ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ चा टिझर रिलीज | पुढारी

Alibaba Ani Chalishitale Chor : 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' चा टिझर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ ( Alibaba Ani Chalishitale Chor ) या नावातच आपल्याला कळतेय की, हा चित्रपट ‘चाळीशी’ भोवती फिरणारा आहे. मात्र, यात काही रम्य रहस्ये दडलेली आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लिपस्टिकचे एक निशाण दिसत होते. या निशाणाबाबत तर्कवितर्क काढत असतानाच आता या चित्रपटाचा जबरदस्त टिझर प्रदर्शित झाला आहे.

संबंधित बातम्या

Alibaba Ani Chalishitale Chor  या चित्रपटाच्या टीझरमध्ये चाळिशीतील मित्रमैत्रिणी पार्टी एन्जॉय करताना दिसत असून अचानक लाईट जातेय आणि अचानक कसलातरी आवाज ऐकू येतोय. लिपस्टिकचे निशाण, संशयास्पद आवाज, त्यात या वयाबाबत असलेला प्रत्येकाचा दृष्टिकोन पाहाता हे काहीतरी धमाल मनोरंजन असणार हे नक्की! सध्यातरी चाळीशीतील या चोरांबद्दलचे हे गूढ अधिकच वाढत आहे, मात्र ते जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २९ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स एल. एल. पी निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे दिग्दर्शक यांनी केलं आहे. या धमाल चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, श्रुती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर आणि अतुल परचुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे निर्माते नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे यांनी केलं आहेत.

Back to top button