नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाशिवरात्रीनिमित्त पंचवटीतील कपालेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परिसरात वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक विभागाने बुधवारी सायंकाळी याबाबत अधिसूचना काढली आहे.
शुक्रवारी (दि. ८) महाशिवरात्रीनिमित्त शहरासह जिल्ह्यातील भाविक कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली असून, पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. महाशिवरात्रीनिमित्त कपालेश्वर मंदिरापासून पंचवटी कारंजा, ढिकले वाचनालय, सरदार चौक, काळाराम मंदिर या मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावरील वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. वाहतूक शाखेचे उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. ८ मार्चला सकाळी पाच ते रात्री १२ या कालावधीत मिरवणूक मार्गावर वाहनांना प्रवेश बंद असेल. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन बच्छाव यांनी केले आहे.
हे मार्ग वाहतुकीसाठी बंद …
ढिकले वाचनालय ते कपालेश्वर मंदिर
मालेगाव स्टॅन्ड ते कपालेश्वर मंदिर
सरदार चौक ते कपालेश्वर मंदिर
गाडगे महाराज पूल ते कपालेश्वर मंदिर
हेही वाचा :