Jalgaon Fraud News : शेअरमध्ये नफ्याचे आमिष दाखवून वृद्धाची 33 लाखांची फसवणूक | पुढारी

Jalgaon Fraud News : शेअरमध्ये नफ्याचे आमिष दाखवून वृद्धाची 33 लाखांची फसवणूक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा-  शेअर खरेदी करून त्यातून अधिकचा नफा देण्याचे अमिष दाखवत एका वृध्दाची ३३ लाख ३० हजार १०० रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना १९ जानेवारी ते २९ फेब्रुवारी दरम्यान घडली असून या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील व्यापारी असलेले रमेश शंकरलाल मोर (वय-६५, रा. पाचोरा) यांना जेसिका नामक व्यक्तीने १९ जानेवारी ते २९ फेब्रुवारी या काळात वेळोवेळी संपर्क साधला. एका कंपनीच्या शेअरचे नाव सांगितले. या शेअरची खरेदी केल्यास त्यातून अधिक नफा मिळेल, असे अमिष दाखवले. त्यासाठी एका ॲपवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगून शेअर खरेदी करायला सांगितले. ते खरेदी केल्यानंतर ॲपवरील खात्यावर वाढीव रक्कम दाखवून मोर यांचा विश्वास संपादन केला. त्यामाध्यमातून वेळोवेळी ३६ लाख १०० रुपये ऑनलाईन स्वीकारले. त्यापैकी २ लाख ७० हजार रुपये परतावा दिला. उर्वरित ३३ लाख ३० हजार १०० रुपये न देता फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रमेश मोर यांनी मंगळवारी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button