Nashik News : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची ९ लाखांची फसवणूक

Nashik News : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची ९ लाखांची फसवणूक
Published on
Updated on

चांदवड(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : कांद्यापाठोपाठ द्राक्ष पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मिळेल त्या दराने द्राक्ष विक्री करीत आहे. अशा परिस्थितीत द्राक्ष खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे न देता पसार होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. चांदवड तालुक्यातील शिंदे येथील एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची पिंपळगाव बसवंत येथील व्यापाऱ्याने तब्बल ९ लाख १२ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा वडनेरभैरव पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

चांदवड तालुक्यातील हवामान उष्ण व कोरडे असल्याने हे वातावरण द्राक्ष निर्मितीसाठी अतिशय पोषक आहे. यामुळे दरवर्षी तालुक्यातील गावांमध्ये ७० टक्के द्राक्ष बागांचे उत्पादन घेतले जाते. द्राक्ष खाण्यास गुळमट, चवदार असल्याने देशासह परदेशात मोठी मागणी असते. हे द्राक्ष खरेदीसाठी राज्यातून, परराज्यातून मोठ्या प्रमाणात व्यापारी येथे येत असतात. सध्या, द्राक्ष विक्री योग्य झाले आहे. मात्र द्राक्ष घेण्यास कोणी व्यापारी धजावत नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल दराने द्राक्ष विक्री करावे लागत आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

तालुक्यातील शिंदे गावातील केशव सुकदेव शिंदे (४८) यांनी शेत गट नंबर १६७, १६९, १७३, १७४ मध्ये द्राक्ष बाग लावली आहे. या द्राक्ष बागा पिंपळगाव बसवंत येथील व्यापारी शेख सलीम शेख शब्बीर बागवान (रा. गाळा नं. ९, जुने मार्केटचे बाजूला पिंपळगाव बसवंत) याने ३८ रुपये प्रतिकिलो दराने २८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान १२ लाख १२ हजार २०० रुपये किंमतीचे ३१९ क्विंटल द्राक्ष खरेदी केले. त्यापैकी ७९ क्विंटलचे ३ लाख रुपये चेकद्वारे व्यापाऱ्याने दिले. मात्र उर्वरित २४० क्विंटल द्राक्षाचे ९ लाख १२ हजार २०० रुपये सबंधित व्यापाऱ्याने अद्याप दिले नाही. याबाबत शेतकरी शिंदे यांनी व्यापाऱ्याकडे पैश्याची मागणी केली मात्र व्यापारी पळून गेला. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे शेतकरी केशव शिंदे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सबंधित व्यापाऱ्या विरोधात वडनेरभैरव पोलिसात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी कुशारे करीत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news