Jalgaon Crime : गांजा सेवन प्रकरणी तिघांवर कारवाई

Jalgaon Crime : गांजा सेवन प्रकरणी तिघांवर कारवाई
Published on: 
Updated on: 

जळगाव : सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून तिनशे रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

शहरातील रेल्वे स्टेशनच्या बाजूला देव हाइट्स हॉटेलच्या मागे मोकळ्या जागेत (दि. 21) च्या सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन हे तिघे करत होते. या प्रकरणी  एनडीपीएस कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संशयित राहुल जगन्नाथ बिरहाडे, रा. गोंदलाल मिल, तेजस सुरेश गोळे, नरेश मांगीलाल विश्वकर्मा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजय निकम हे करीत आहेत. गांजा सेवन करणाऱ्यावर कारवाई होत असली तरी अद्याप गांजा विक्री करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. शहरात खुलेआम गांज्याची विक्री होत असून त्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news