Nashik Murder : ‘त्या’ अनोखळी युवकाची वार करून हत्या, तपासात निष्पन्न

Nashik Murder : ‘त्या’ अनोखळी युवकाची वार करून हत्या, तपासात निष्पन्न
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात पुन्हा एकदा खुनाचे सत्र सुरू झाले आहे. नाशिकरोड, उपनगर, सिडको परिसरात खुनाच्या एकापाठाेपाठ एक घटना उघडकीस आल्यानंतर आता गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील खुनाची घटना समोर आली आहे. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या युवकाची वार करून हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.

सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पाटील वाड्याकडे जाणाऱ्या एका रस्त्यालगत अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी गुन्हे शोध पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता पोटावर काहीतरी शस्त्राने दुखापत केल्याचे आढळून आले. तातडीने याठिकाणी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. गुगल श्वानाने परिसर पिंजून काढला. यानंतर गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकानेही घटनास्थळी हजेरी लावून पाहणी केली. परिसरातील एका बांधकाम मजुराचा हा मृतदेह असावा आणि त्याचे वय अंदाजे ३० ते ३२ वर्षे असू शकते, असे सोनवणे यांनी सांगितले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात पोलिस अंमलदार नाना कोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनवणे या करीत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news