Lasalgaon onion price : निर्यात बंदी हटवताच कांद्याच्या बाजारभावात तेजी, लासलगावी ‘इतका’ भाव | पुढारी

Lasalgaon onion price : निर्यात बंदी हटवताच कांद्याच्या बाजारभावात तेजी, लासलगावी 'इतका' भाव

लासलगाव(जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल (दि. 18) कांदा निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आज सोमवारी (दि. 19) शनिवारच्या तुलनेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात 661 रुपयांची वाढ झाली आहे.  कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यावर समाधान व्यक्त केले आहे. आज सकाळच्या सत्रात 300 वाहनातून कांदा विक्रीसाठी दाखल झाला. या कांद्याला जास्तीत जास्त 2101, कमीतकमी 1000 रुपये तर सरासरी 1800 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. मात्र अटी शर्ती न ठेवता संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी हटवण्याची मागणी कांदा निर्यातदार व्यापारी करत आहे.

सव्वा दोन महिन्यांमध्ये विक्री झालेल्या कांद्याच्या पाठीमागे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याने विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल मागे दोन ते तीन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहे.

अधिकृत अध्यादेश न आल्याने संभ्रम

तब्बल ७२ दिवसांनंतर काल (दि. 18) केंद्र सरकारच्या समितीने कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी हटवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण यासंदर्भातील केंद्र सरकारचा अधिकृत निर्णयाची प्रत अद्याप समोर आलेली नसल्याने कांदा निर्यात बंदी हटवण्याबाबत संभ्रम अवस्था आहे.

हेही वाचा :

Back to top button