Jalgaon Crime : गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या | पुढारी

Jalgaon Crime : गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

जळगाव पुढारी वृत्तसेवा– शहरातील शाळेच्या पाठीमागे बेकायदेशीर रित्या गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या संशयित आरोपीला शनिपेठ पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडून ५ हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल हस्तगत केला आहे. याप्रकरणी रात्री १०.३० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या पाठीमागील भागात संशयित आरोपी ईश्वर रामा पारधी (वय-२३) रा. धानोरा ता. जळगाव हातात गावठी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश टिकले, पोलीस हेडकॉन्स्टेबल परिष जाधव, राहुल पाटील, राहुल घेटे आणि अनिल कांबळे यांना कारवाई करण्यासाठी रवाना केले. दरम्यान पथकाने सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी ईश्वर पारधी याला अटक केली. त्याच्याकडून ५ हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल हस्तगत केला आहे. या याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (दि. 18) च्या रात्री १०.३० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल परिस्थिती जाधव हे करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button