Sindhudurg Shiv Jayanti : ओरोस परिसरात विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी | पुढारी

Sindhudurg Shiv Jayanti : ओरोस परिसरात विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी

ओरोस, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आज (दि.१९) साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाळ अर्पण करीत अभिवादन कऱण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, पी. एम. विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते. Sindhudurg Shiv Jayanti

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्गच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक नामदेव मठकर सह ग्रामस्थ उपस्थित होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी विभागप्रमुख नागेश ओरसकर, महेश पारकर व शिवप्रेमी तरुण नागरिक उपस्थित होते. Sindhudurg Shiv Jayanti

यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यातून प्रज्वलीत केलेली शिवज्योत ओरोसपर्यंत दौड करून आणण्यात आली. तसेच जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक रोषणाई, रंगरंगोटी, भगवे झेंड्यांनी परिसर शिवमय झाला होता. तर जय भवानी… जय शिवाजी… अशा घोषणा, शिवाजी महाराजांचे पोवाडे व अन्य गीतांनी परिसर दणाणून गेला होता.

हेही वाचा 

Back to top button