Shiv Jayanti 2024 : विद्यार्थ्यांच्या हाताच्या ठशांपासून साकारले छत्रपती शिवाजी महाराज | पुढारी

Shiv Jayanti 2024 : विद्यार्थ्यांच्या हाताच्या ठशांपासून साकारले छत्रपती शिवाजी महाराज

विशाळगड : सुभाष पाटील : शाहूवाडी तालुक्यातील ओकोली येथील बटरफ्लाय इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील कलाशिक्षक व येळाणे येथील केवल किरण यादव या कलाशिक्षकाने विद्यार्थी, शिक्षक यांच्या हाताच्या ठशांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटले आहे. (Shiv Jayanti 2024)

संबंधित बातम्या : 

यापूर्वी त्यांनी विद्यार्थी दशेत 4 बाय 5 एमएम इतक्या लहान साईजमध्ये 16 मिनिटे 15 सेकंदांत छ. शिवाजी महाराज यांचे ड्रॉईंग कागदावर रेखाटून आशिया व इंडिया बूक रेकॉर्डमध्ये अनोखा विक्रम यापूर्वी केला आहे. केवल यादव यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत चारशेहून अधिक विविध चित्रे काढली आहेत; पण काही तरी वेगळे करण्याची त्यांची जिद्द असल्यामुळे त्यांनी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हाताच्या ठशांपासून शिवराय साकारण्याचा मनोदय करून तो पूर्ण केला. पेन्सिलच्या टोकावर तसेच तांदळावर नाव लिहिणे अशा कलाकृतीही त्यांनी यापूर्वी काढल्या आहेत. शिवाजी विद्यापीठांतर्गत आयोजित युवक महोत्सवात त्यांनी कोलाज व पेंटिंग मेकिंग कला प्रकारात सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे. (Shiv Jayanti 2024)

हेही वाचा : 

Back to top button