Dhule | राज्यस्तरीय स्पर्धेत पिंपळनेरच्या तनुष्काने पटकावले ब्रांझ पदक | पुढारी

Dhule | राज्यस्तरीय स्पर्धेत पिंपळनेरच्या तनुष्काने पटकावले ब्रांझ पदक

पिंपळनेर,जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र-पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे द्वारा, मीरा-भाईंदर महानगरपालिका व सिकाई मार्शल आर्ट संघटना यांच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय शालेय सिकाई मार्शल आर्ट (2023-24) स्पर्धा पार पडली. यामध्ये 19-वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत कर्म. आ. मा. पाटील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर येथील इ‌यत्ता अकरावीची विद्यार्थिनी कु. तनुष्का महेश मराठे हीने ब्रांझ पदक पटकावले आहे. तनुष्का ही इंदिरा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक महेश मराठे यांची कन्या होय‌. राजे छत्रपती इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन संभाजीराव अहिरराव, प्राचार्या सोनाली पाटील, क्रीडा शिक्षक अमोल अहिरे, गायकवाड यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तनुष्काच्या यशाबद्दल पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आर. एन. शिंदे, उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे, एच. आर. गांगुर्डे, प्राचार्य ए. बी. मराठे व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य पी. एच. पाटील, उपप्राचार्य किरण कोठावदे, श्रीमती माळी, पर्यवेक्षक एच‌. के. चौरे, क्रीडा शिक्षक आनंद पाटील, जयेश खैरनार, जिल्हा परिषदेच्या सदस्या सुधामती गांगुर्डे, पिंपळनेर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय गांगुर्डे आदींनी कौतुक केले.

हेही वाचा:

Back to top button